White Pumpkin : पिवळाच नाही तर पांढरा भोपळाही आरोग्यासाठी आहे गुणकारी; पाहा फायदे
भोपळ्याची भाजी जवळपास सर्वांनीच खाल्ली असेल. अनेक लोकांना त्याची गोड चव आवडते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभोपळ्याच्या भाजीचे दोन प्रकार असतात. पांढरा भोपळा आणि पिवळा भोपळा.
पांढरा भोपळ्यामध्ये भरपूर पोषक असतात. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, सी आणि ई मुबलक प्रमाणात आढळतात.
भोपळ्यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, फोलेट, नियासिन आणि थायामिन यांसारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात. जे तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्त होण्यास मदत करेल.
सांधेदुखीमध्ये पांढरा भोपळा खूप फायदेशीर आहे. तुमच्याही पायाला सूज येत असेल तर सकाळी एक ग्लास भोपळ्याचा रस प्यायला सुरुवात करा.
जर तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर पांढऱ्या भोपळ्याचा रस किंवा भाजी नक्की खा. हे संक्रमणाशी लढण्यास मदत करेल.
दृष्टीसाठीही ही भाजी खूप फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. ज्यांना रातांधळेपणा वगैरे तक्रारी आहेत त्यांनी ही भाजी खाण्यास सुरुवात करावी.
दम्याच्या रुग्णांसाठीही ही भाजी खूप फायदेशीर आहे. कारण यामध्ये असणारे अँटी-ऑक्सिडंट श्वसनसंस्थेतील संसर्ग रोखतात. त्यामुळे आतापासून या भाजीचा आहारात समावेश करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.