Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
व्हिस्कीची बॉटल पारदर्शक असते, मग बिअरची का नाही?; जाणून घ्या यामागचं नेमकं कारण!
दारूचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी बिअर देखील एक आहे. लोकांना विशेषतः उन्हाळ्यात बिअरचे जास्त प्रमाणात सेवन करतात . मात्र, व्हिस्कीच्या तुलनेत बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण खूपच कमी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिअर ही कॅन आणि काचेच्या बॉटलमध्ये येते. पण तुम्हाला माहीत आहे का की, वाईनसारख्या पारदर्शक बॉटलमध्ये बिअर का येत नाही?....
तुम्ही बिअर प्यायला असो वा नसो, तुम्ही कधी ना कधी बिअरची बॉटल पाहिली तर असेल.
बाजारात विविध ब्रँडची बिअर उपलब्ध आहे. तुमच्या लक्षात आले असेल की, बिअरच्या बॉटल एकतर हिरव्या रंगाच्या असतात किंवा तपकिरी रंगाच्या असतात.
आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येईल की बिअरच्या बॉटलच्या रंगाचा त्याच्याशी काय संबंध?, पण, या बिअरच्या बॉटलचा रंग असा असण्यामागे एक मोठं कारण आहे.
बिअर कंपनी हजारो वर्षांपूर्वी प्राचीन इजिप्तमध्ये सुरु झाली होती. कारण त्यावेळी बिअर पारदर्शक बॉटलमध्ये पॅक केली जात होती. यावेळी असे आढळून आले की बिअर पांढऱ्या बॉटलमध्ये असल्याने, सूर्याच्या किरणांमधून बाहेर पडणारे अल्ट्राव्हायोलेट किरण (UV Rays) बिअरमध्ये असलेले अॅसिड खराब करत होते दुर्गंधी येऊ लागली आणि लोकांना ते पिऊ शकले नाही.
बिअर बनवणाऱ्या लोकांनी या समस्येवर उपाय शोधत बिअरच्या बॉटलवर तपकिरी रंगाच्या लेप केलेल्या बॉटल निवडल्या. या रंगाच्या बॉटलमधील बिअर खराब झाली नाही. कारण सूर्यकिरणांचा तपकिरी रंगाच्या बॉटलवर परिणाम झाला नाही. त्यामुळे व्हिस्कीच्या बॉटल आणि बिअरच्या बॉटलमध्ये फरक असतो.