Menstruation tips: मासिक पाळीत 'हे' पदार्थ म्हणजे आजाराला आमंत्रणच? जाणून घ्या...

menstruation tips : मासिक पाळीच्या दिवसांत स्त्रियांची शारीरिक स्थिती थोडी नाजूकच असते. या काळात काय खायचं आणि काय टाळायचं याची योग्य माहिती असणं महत्त्वाचं आहे.

Continues below advertisement

मासिक पाळीत नेमके कोणते पदार्थ खाऊ नये

Continues below advertisement
1/6
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मासिक पाळी सुरु असताना तळलेले आणि तेलकट पदार्थ टाळावेत. अशा पदार्थांमुळे त्वचेवर पिंपल्स येण्याची शक्यता वाढते.
2/6
दुधाचे पदार्थ जसे की, दूध, पनीर शक्यतो टाळावेत. काही महिलांना या पदार्थांच्या सेवनामुळे पिरियड क्रॅम्प्स वाढण्याची शक्यता असते. तसेच, पचनावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
3/6
कॉफी किंवा कॅफिनयुक्त पदार्थ कमी घ्यावेत. कॅफिनमुळे हार्मोन्सची पातळी बदलते आणि काही वेळा रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अस्वस्थता वाढू शकते.
4/6
अति प्रमाणात मीठ आणि तिखट पदार्थ टाळावेत. हे पदार्थ शरीरात गॅस तयार करतात आणि यामुळे पोट फुगण्याची समस्या वाढते. त्यामुळे तुम्हाला सतत अस्वस्थ वाटेल.
5/6
फ्रोझन फूड, फास्ट फूड, बेकरी प्रॉडक्ट्स , लोणचं आणि पापड यांचं सेवनही कमी करावं. हे पदार्थ शरीरात जळजळ वाढवतात आणि यामुळे पाळीत त्रास वाढू शकतो.
Continues below advertisement
6/6
(टीप: वरील माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola