चहलच्या टीशर्टवरील वाक्यामुळे धनश्री वर्मा भडकली, पण त्याचा अर्थ काय?

युजवेंद्र चहलच्या Be Your Own Sugar Daddy या टी-शर्टवरील कोटने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. या चर्चेचा खरा अर्थ, कंट्रोव्हर्सी आणि त्यामागचं संपूर्ण कारण जाणून घ्या इथे!

Chahal wearing famous "Be Your Own Sugar Daddy " T- shirt

1/8
प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल मार्चमध्ये त्यांच्या घटस्फोटाच्या न्यायालयीन कामकाजाला उपस्थित होता. त्याने मोठ्या अक्षरात लिहिलेला काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता ज्यावर "बी युवर ओन शुगर डॅडी" लिहिलेले होते.
2/8
चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे, त्यामुळे त्याच्या या शर्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.
3/8
सध्या चहल भारताच्या कोणत्याही संघात नाही. पण आयपीएल 2025 मध्ये त्याने पंजाब किंग्ज संघाकडून अंतिम फेरी गाठली होती.
4/8
मात्र त्याने घातलेला हा शर्ट अनेकांना खटकला आणि त्यामुळे सोशल मीडियावर वादळ उठलं आहे.
5/8
या शर्टवर असलेल्या "Sugar Daddy" या शब्दामुळेच ही सगळी कंट्रोव्हर्सी झाली आहे. हा शब्द सोशल मीडियावर नेहमी वापरला जातो आणि त्याचा अर्थ थोडा वेगळा असतो.
6/8
साध्या भाषेत सांगायचं झालं, तर "Sugar Daddy" म्हणजे असा मोठ्या वयाचा श्रीमंत पुरुष, जो एखाद्या तरुण मुलीला पैसे, गिफ्ट्स, महागड्या वस्तू किंवा ट्रिप्स पुरवथो .
7/8
"Sugar Daddy" त्याच्या बदल्यात तो त्या मुलीसोबत वेळ घालवतो, किंवा कधी कधी रोमँटिक नातं ठेवतो.
8/8
शेवटी, चहलने हा शर्ट फक्त एक छान स्टाईल स्टेटमेंट म्हणून घातला असेल, तरी त्यावरील वाक्यांश आणि त्याच्या वैयक्तिक परिस्थितीमुळे सोशल मीडियावर लोक त्याचे वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावत आहेत.
Sponsored Links by Taboola