Highway Hypnosis : रोड हिप्नॉसिस म्हणजे काय? त्यामुळे अपघात कसा होतो? अशा वेळी काय काळजी घ्यावी

रोड हिप्नॉसिसमध्ये मागच्या 15 मिनिटांमध्ये काय झालं याची कल्पना त्या ड्रायव्हरला नसते. असं जर घडत असेल तर ते धोकादायक आहे.

Highway Hypnosis

1/10
आज आपण एका अशा आजाराबद्दल जाणून घेणार आहोत ज्याबद्दल अनेकांना तो अस्तित्वात आहे हे देखील माहित नाही. तो आजार आहे हायवे हिप्नोसिस .
2/10
या आजारात हायवेचे रस्ते बघितल्यावर माणूस भरकटायला लागतो आणि आपल्यासोबत काय चाललंय हेही कळत नाही. या स्थितीत अनेकवेळा एखादी व्यक्ती अपघाताला बळी पडू शकते.
3/10
चला तर मग जाणून घेऊया काय आहे हा आजार, कसा टाळता येईल?
4/10
हायवे हिप्नोसिस किंवा ड्रायव्हिंग हिप्नोसिस तेव्हा होते जेव्हा ड्रायव्हर गाडी चालवताना काय करत आहे हे विसरतो. या आजारात, अनेकदा असे घडते की एखादी व्यक्ती गाडी चालवते आणि काही किलोमीटर तो व्यक्ती तसाच गाडी चालवत राहतो आणि त्याला काहीही आठवत नाही.
5/10
प्रामुख्याने या आजारात ड्रायव्हर गाडी चालवत असतो, त्याचे स्टेअरिंगवर नियंत्रण असते पण तो त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही.
6/10
हायवे हिप्नोसिसची कारणे - सतत गाडी चालवणे , झोपेचा अभाव , थकवा , कशावरही लक्ष केंद्रित न होणे.
7/10
हायवे हिप्नोसिस टाळण्यासाठी या गोष्टी करा - जर तुम्हाला कारने कुठेतरी प्रवास करायचा असेल तर सर्वप्रथम तुमची झोप पूर्ण करावी, सतत वाहन चालवणे टाळा. एक किंवा दोन तासांत ब्रेक घेत राहा.
8/10
स्वतःला हायड्रेटेड ठेवा. त्यामुळे मध्येच पाणी किंवा ज्यूस प्या , वाटेत झोप येऊ नये म्हणून चहा किंवा कॉफी पित राहा.
9/10
मोठ्या आवाजात संगीत ऐका. शांत आणि मंद गाणी ऐकू नका, यामुळे तुम्हाला झोप लागू शकते.
10/10
प्रवासादरम्यान जास्त खाऊ नका कारण यामुळे झोप येऊ शकते , जर तुम्हाला असा आजार असेल तर रात्री प्रवास न करता दुपारी किंवा सकाळी करा.
Sponsored Links by Taboola