Heart Failure : हार्ट फेलियर एक गंभीर समस्या; वाचा लक्षणं आणि उपाय

ही अवस्था बहुतेक वेळा हळुहळू येते. सुरुवातीला बऱ्याच लोकांना याची काही लक्षणं दिसत नाहीत, पण नंतर श्वास घेण्यात त्रास, थकवा आणि सूज हळुहळू वाढतात.

Continues below advertisement

Heart Failure : ही अवस्था बहुतेक वेळा हळुहळू येते. सुरुवातीला बऱ्याच लोकांना याची काही लक्षणं दिसत नाहीत, पण नंतर श्वास घेण्यात त्रास, थकवा आणि सूज हळुहळू वाढतात.. (Photo Credit : Pinterest)

Continues below advertisement
1/10
सध्याच्या धावपळीच्या काळात हृदयाशी संबंधित अनेक समस्या उद्भवणं अगदी सामान्य झालं आहे. हृदयविकार, उच्च रक्तदाब, हॉर्ट अटॅक, हार्टमध्ये ब्लॉकेज असणं यांसारख्या समस्या तर आपल्याला माहितच आहेत.
2/10
पण, तुम्हाला हॉर्ट फेलियर म्हणजे नेमकं काय? हे माहित आहे का. नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.
3/10
खरंतर, हार्ट फेलियर कोणत्याही वयात होऊ शकतो. पण वयस्कर असलेल्या लोकांना त्याचा धोका जास्त असतो. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे,उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि धूम्रपान ही यामागची मुख्य लक्षणं आहेत.
4/10
आजकालची झपाट्याने बदलणारी जीवनशैली आणि वाढत्या तणावामुळे हार्ट फेलियर ही मोठी समस्या बनली आहे. आधी हा आजार फक्त ज्येष्ठ लोकांमध्ये दिसायचा, पण आता तरुणांमध्ये देखील हार्ट फेलियरचं प्रमाण वाढतंय.
5/10
जेव्हा हृदय व्यवस्थित पंप करत नाही, म्हणजेच हृदयाची हालचाल कमजोर पडते आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा हार्ट फेलियर होतो.
Continues below advertisement
6/10
जेव्हा हृदयाचे स्नायू खूप घट्ट होतात किंवा खूप कमकुवत होतात, तेव्हा रक्त व्यवस्थित पंप होत नाही आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागात पाणी साचू लागतं यामुळे याला कधी कधी “कंझेस्टिव हार्ट फेलियर” असेही म्हणतात.
7/10
हृदयाचा उजवा भाग फुफ्फुसांना रक्त पुरवतो आणि डावा भाग फुफ्फुसांमधून ऑक्सिजनयुक्त रक्त शरीराच्या बाकी भागात पोहोचवतो. जेव्हा ही प्रक्रिया नीट होत नाही, तेव्हा थकवा येतो आणि पाय किंवा पोट सुजल्यासारखं वाटतं.
8/10
ही अवस्था बहुतेक वेळा हळुहळू येते. सुरुवातीला बऱ्याच लोकांना याची काही लक्षणं दिसत नाहीत, पण नंतर श्वास घेण्यात त्रास, थकवा आणि सूज हळुहळू वाढतात.
9/10
यासाठी जर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये थोडासा बदल केला. वेळेवर औषधं घेतली किंवा नियमित व्यायाम केला तर यावर मात करु शकता.
10/10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola