Weight Loss : दुपारच्या जेवणात ‘हे’ पदार्थ खा अन् झटपट वजन कमी करा!
आजच्या धकाधकीच्या जीवनात तंदुरुस्त राहणे हे एक मोठे आव्हान आहे. भारतात कोरोना महामारीमुळे सर्वजण घरून काम करत आहेत. अशा परिस्थितीत लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपापल्या कामात व्यस्त असतात. आपण आपल्या खाण्याकडे नीट लक्ष देऊ शकत नाहीत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सर्व कारणांमुळे आपले वजन झपाट्याने वाढू लागते. अशावेळी वजन कामी करण्यासाठी लोक सहसा सकाळी आणि रात्रीच्या जेवणात डाएट फॉलो करतात. पण दुपारच्या जेवणात संतुलित आहार न घेतल्याने तुमची संपूर्ण आहार योजना बिघडू शकते.
दुपारचे जेवण हा तुमच्या मुख्य आहाराचा भाग आहे. अशा परिस्थितीत दुपारच्या जेवणात प्रोटीन, कॅलरी, फायबर यासारख्या गोष्टींचा समावेश करावा. जेणेकरून तुमचे वजन सहज कमी होईल.
image 5भाज्या हा आपल्या भारतीय जेवणाचा मुख्य भाग आहे. अधिकाधिक भाज्यांचे सेवन केल्याने तुमच्या शरीराचे नैसर्गिक संतुलन राखण्यास मदत होते. तसेच, दुपारच्या जेवणात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने तुम्हाला भरपूर लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए मिळते. याच्या सेवनाने तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.
डाळीचे सेवन केल्याने तुम्हाला खूप फायदे मिळतात, हे देखील पूर्णपणे खरे आहे. डाळीमध्ये प्रथिने, लोह, झिंक मुबलक प्रमाणात आढळते. डाळ शरीराला हायड्रेट ठेवण्यासही मदत करते. यासाठी तुम्ही रोज वेगवेगळ्या डाळींचे सेवन करू शकता.
तुम्ही दुपारच्या जेवणात दह्याचे सेवन करावे. अन्न सहज पचवण्यासाठी आणि जेवणाची चव वाढवण्यासाठीही दही खाल्लं जातं.