Health tips: आहारामध्ये थोडा बदल करा आणि आपले वजन कमी करा..!!
Health tips: चुकीच्या आहारामुळे अनेक आजार निर्माण होतात. पचनाचे विकार, ताणतणाव, मधुमेह, रक्तदाब आणि लठ्ठपणा हे त्यातील प्रमुख आजार आहेत.
Continues below advertisement
Health tips
Continues below advertisement
1/11
आहारामध्ये थोडेसे बदल केल्यास तुमचे वजन नैसर्गिकरीत्या कमी होऊ शकते.
2/11
दुपारी फळे किंवा मोड आलेले कडधान्य घेतल्याने शरीर हलके आणि ऊर्जावान राहते.
3/11
सायंकाळी हलका आहार घ्यावा, ज्यात भाज्यांचे प्रमाण जास्त असावे.
4/11
जेवताना पाणी पिऊ नये, तर जेवणानंतर दीड तासांनी पाणी प्यावे. सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी घेतल्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडतात.
5/11
मासाहारी पदार्थ आणि थंड पेय यांचाही त्याग करावा.
Continues below advertisement
6/11
दररोज सकाळी 45 मिनिटे चालणे ही उत्तम सवय आहे.
7/11
दूध टाकलेला चहा, फास्टफूड आणि बेकरी पदार्थ टाळल्यास आरोग्य सुधारते. प्रक्रिया केलेले व डबाबंद पदार्थ शरीरासाठी हानिकारक असतात.
8/11
प्राणायाम, सूर्यनमस्कार आणि ध्यान केल्याने मन शांत राहते आणि शरीर तंदुरुस्त राहते.
9/11
अशा सवयी तीन महिने पाळल्यास शरीरातील अनेक आजार दूर होतात. रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात येतात आणि वजन नैसर्गिकरीत्या कमी होते.
10/11
योग्य आहार, व्यायाम आणि निसर्गोपचार यांच्या सहाय्याने तुम्ही निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्यी राहू शकता.
11/11
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Published at : 29 Oct 2025 04:33 PM (IST)