Weight Loss Tips : फक्त 15 दिवसांत 'या' घरगुती पेयांद्वारे वजन कमी करा; आरोग्यासाठीही गुणकारी

Weight Loss Tips

1/6
तुम्हालाही घाम न येता तुमचे वाढते वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर ही पेये तुमच्यासाठी आहेत. काही घरगुती पेयांचा वापर करून तुम्ही 15 दिवसांत तुमचे वजन नियंत्रित करू शकता. हे बनवणे खूप सोपे आहे तसेच या पेयांमधील सर्व साहित्य तुमच्या स्वयंपाकघरात आहे. चला जाणून घेऊया या पेयांबद्दल.
2/6
जिरे पाणी : हे करण्यासाठी तुम्हाला एक चमचा जिरे एका ग्लास पाण्यात भिजवून रात्रभर ठेवावे लागेल. आता हे पाणी गाळून घ्या. आता हे पाणी उकळून त्यात काळे मीठ टाकून गरम प्या.
3/6
ओव्याचे पाणी : यासाठी ओवा गरम पाण्यात टाका. तो चांगला उकळा. उकळल्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि लिंबाचा रस आणि काळे मीठ घालून गरम प्या. यामध्ये तुम्ही गूळही घालू शकता.
4/6
हळदीचे पाणी : एका भांड्यात दोन कप पाणी घेऊन त्यात चिमूटभर हळद घाला. आता त्यात दालचिनी घाला. आता या पाण्याला कढ येईपर्यंत उकळा. त्यानंतर हे पाणी गाळून थंड झाल्यावर प्या.
5/6
आले लिंबूपाणी : हे करण्यासाठी, एक ग्लास गरम पाणी घ्या, त्यात लिंबू, आल्याचा रस आणि दालचिनी पावडर घाला हे चांगले मिक्स करा. आणि पाणी प्या. यामुळे तुम्हाला नक्की आराम मिळेल.
6/6
लिंबू मध पाणी : वजन कमी करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या.
Sponsored Links by Taboola