Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी; तुमची आर्थिक स्थिती सुधारेल
खूप प्रयत्न करूनही जर आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर हा वास्तु उपाय तुमच्या समस्या दूर करू शकतो. झोपताना यापैकी एक गोष्ट तुमच्या उशीखाली ठेवा. असं मानलं जातं की या गोष्टींमध्ये आश्चर्यकारक सकारात्मकता आहे, ज्यामुळे जीवनाची आर्थिक स्थिती बदलते. जाणून घेऊया अशा गोष्टींबद्दल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलसूण: लसणाच्या कळ्या उशीखाली ठेवून झोपण्याचे अनेक फायदे आहेत. असं मानलं जातं की यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढू लागतो. मानसिक अस्वस्थता दूर करण्यासाठी, चांगली झोप लागण्यासाठी आणि उत्साही राहण्यासाठी उशीखाली लसणाची कळी ठेवून झोपा.
तुळस: तुळशीची पानं उशीखाली ठेवून झोपल्याने सौभाग्य प्राप्त होतं आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. झोपताना तुळशीचं पान उशीखाली ठेवल्याने आयुष्यात चांगले क्षण येऊ लागतात.
मोरपंख: झोपताना उशीखाली मोरपंख ठेवा. पैशाशी संबंधित समस्या यामुळे दूर होऊ शकतात. जर तुम्ही सतत पैसे कमी झाल्यामुळे किंवा उत्पन्नापेक्षा जास्त खर्चामुळे त्रस्त असाल तर हा उपाय तुमची समस्या दूर करू शकतो.
एक रुपयाचं नाणं: जर तुम्ही आजार किंवा आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर झोपताना एक रुपयाचं नाणं उशीखाली ठेवा. यामुळे आजारांपासून आराम मिळतो. यासोबतच पैशाची समस्याही या उपायाने दूर होऊ शकते.
हळकूंड: झोपताना उशीखाली एक हळकूंड ठेवा, त्यामुळे नोकरीच्या संधी निर्माण होऊ लागतात. त्याचबरोबर नोकरी-व्यवसायात येणाऱ्या अडचणीही दूर होतील. ज्यांना नोकरी न मिळाल्याने सतत चिंता असते त्यांनी हा उपाय अवश्य करावा.