Weight Loss Tips: चरबी कमी करायचीये? हळदीचे पाणी रोज प्या!
आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांचा खूप उपयोग होतो. हळदीचे प्रकरण वेगळे आहे. याला मसाला म्हणण्यापेक्षा औषध म्हणणे योग्य ठरेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. हळदीमध्ये अँटी-बायोटिक अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे अनेक आजार बरे करण्याचे काम करतात.
हळद आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, ती वजन कमी करण्यासाठी वापरली जाते. हळद पाण्यात मिसळून प्यायल्याने वजन कमी होते. चला जाणून घेऊया हळदीचे पाणी कसे बनते.
हळदीमध्ये असलेले पोषक तत्व वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. हळदीमध्ये पॉलीफेनॉल, कर्क्यूमिन संयुगे असतात, जे चरबी कमी करण्याचे काम करतात. वजन कमी करण्यासाठी हळदीचे पाणी तयार करून प्यावे.
हळदीचे पाणी बनवण्यासाठी दळलेल्या हळदीऐवजी नैसर्गिक हळदीच्या गुठळ्या घ्या. ही हळद 2 कप पाण्यात टाका आणि पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. या हळदीच्या पाण्यात पोषक घटक बाहेर येतील. पाणी गाळून त्यात थोडा मध मिसळून कोमट करून प्या. रोज रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने वजन कमी होते.
वजन कमी करण्यासोबतच हळदीचे पाणी प्यायल्याने अनेक फायदे होतात. रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने सांधेदुखी दूर होते.
हळदीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. हे पाणी प्यायल्याने आजारांशी लढण्याची शक्ती मिळते. सर्दी, खोकला यांसारख्या समस्या दूर होतात.
हळदीचे पाणी प्यायल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. हळदीचे पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. या पाण्याने रक्त पातळ राहते, त्यामुळे रक्त गोठण्याचा धोका राहत नाही आणि हृदय निरोगी राहते.
(सर्व फोटो सौजन्य :unsplash.com/) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.