POLLUTION : गर्भातील बाळावरही होतो प्रदूषणाचा परिणाम
गर्भातील बाळावरही होतो प्रदूषणाचा परिणाम
Continues below advertisement
गर्भातील बाळावरही होतो प्रदूषणाचा परिणाम
Continues below advertisement
1/6
वायू प्रदूषण फक्त फुफ्फुसांनाच नाही, तर महिलांच्या प्रजनन क्षमतेवर आणि गर्भावस्थेवरही गंभीर परिणाम करत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये वाढणाऱ्या गर्भपाताच्या घटनांनी चिंता वाढली आहे.
2/6
लोकांना आतापर्यंत वाटत होते की प्रदूषण फक्त आपल्या फुफ्फुसांना, श्वसन संस्थेला आणि हृदयाला आजारी बनवते. पण एका संशोधनानुसार, प्रदूषण महिलांच्या आणि पुरुषांच्या प्रजनन क्षमतेलाही प्रभावित करते. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे प्रदूषणामुळे महिलांच्या गर्भधारणावर गंभीर परिणाम होत आहेत आणि हॉस्पिटलमध्ये गर्भपाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषित हवा आणि अत्यंत वाढलेला AQI यामुळे महिलांमध्ये मिसकॅरेजचे प्रमाण वाढत आहे, ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे.
3/6
चीनमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, गंभीर पातळीचे प्रदूषण महिलांसाठी मोठा धोका ठरत आहे. या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की प्रदूषित वातावरणात किंवा प्रदूषणाच्या सतत संपर्कात राहिल्यामुळे महिलांच्या अंडाशयातील अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता दोन्हीवर हानिकारक परिणाम होत आहेत. त्यामुळे अंड्यांची संख्या कमी होत असल्याचेही दिसून आले आहे.
4/6
भारतामध्ये दिल्ली-एनसीआर ही प्रदूषणाने अत्यंत त्रस्त क्षेत्रांपैकी एक आहे. अनेक डॉक्टरांच्या मते, येथे प्रेग्नंट महिलांची संख्या हॉस्पिटलमध्ये वाढत चालली आहे. प्रेग्नंट महिला सर्दी , खोकला, ताप यांसारख्या समस्या घेऊन येत आहेत. या कारणामुळे अनेक IVF सर्जरी रद्द कराव्या लागत आहेत, कारण महिलांमध्ये संसर्ग व सर्दी वाढत आहे.
5/6
AMH हार्मोनवर प्रदूषणाचा परिणाम एका संशोधनानुसार एखादी महिला दीर्घकाळ प्रदूषित वातावरणात राहत असेल तर तिच्या शरीरातील एंटी-म्युलरियन हार्मोन (AMH) चे प्रमाण कमी होते. AMH हार्मोन हे ओव्हरीमध्ये किती अंडे शिल्लक आहेत हे दर्शवते. जर AMH चे प्रमाण कमी झाले तर ओव्हरीमध्ये फारच कमी अंडे उरली आहेत, म्हणजेच प्रजनन क्षमतेवर थेट परिणाम होतो.PM 2.5, PM 10, PM 1 आणि नायट्रोजन डायऑक्साइड (NO2) यांचे प्रमाण जास्त असेल तर शरीरातील AMH हार्मोन आपोआप कमी होते.
Continues below advertisement
6/6
जिथे वायू प्रदूषण जास्त असते अशा ठिकाणी राहणाऱ्या महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनाचा धोका वाढतो, ज्यामुळे मासिक पाळीत अनियमितता निर्माण होऊ शकते. PM 2.5 आणि NO2 यांसारखे प्रदूषक प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन या हार्मोन्सवर वाईट परिणाम करतात आणि प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होतो
Published at : 22 Dec 2025 04:22 PM (IST)