Olive Oil For Dark Lips: हिवाळ्यात ओठांचा रंग काळा झाला असेल तर हे घरगुती उपाय करून पाहा!
हिवाळ्यात काळे आणि फाटलेल्या ओठांमुळे अनेकांना त्रास होतो. चेहऱ्याचा रंग गोरा असला तरी ओठ काळे असल्याचे अनेक लोकांसोबत पाहायला मिळते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाळे ओठ दूर करण्यासाठी लोक महागडे ब्युटी ट्रीटमेंट आणि अनेक रासायनिक सौंदर्य उत्पादने वापरतात. पण यानंतरही ओठांचा काळेपणा दूर होत नाही.
तज्ज्ञांच्या मते काळे ओठ धुम्रपान, धूळ आणि प्रदूषणामुळे होतात. याशिवाय जे कमी पाणी पितात, त्यांचे ओठही काळे पडतात. पण तुम्ही घरीच तुमचे ओठ गुलाबी करू शकता. चला जाणून घेऊया गुलाबी ओठांसाठीचे उत्तम घरगुती उपाय.
ऑलिव्ह ऑईल केवळ केसांसाठीच नाही तर ओठांसाठीही खूप प्रभावी आहे. ऑलिव्ह ऑइलच्या मदतीने तुम्ही तुमच्या ओठांचा काळेपणा दूर करू शकता.
रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑईल मध मिसळून लावा. त्याचा परिणाम काही दिवसांत दिसून येईल.
ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही साखर-ऑलिव्ह ऑइलचा स्क्रब वापरू शकता.
यासाठी ऑलिव्ह ऑईलमध्ये साखर मिसळून ओठ स्क्रब करा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा लिप स्क्रब करा. असे केल्याने काळ्या ओठांपासून काही वेळात सुटका होईल.
एलोवेरा जेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला माहित आहे का ऑलिव्ह ऑईल आणि एलोवेरा जेल मिक्स करून ओठांवर लावल्याने ओठांचा काळेपणा दूर होतो.
ऑलिव्ह ऑईल ओठांना हायड्रेट ठेवते. रोज रात्री झोपण्यापूर्वी हा लिप बाम लावा. त्याचा परिणाम काही दिवसांत दिसून येईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (सर्व फोटो सौजन्य:unsplash.com)