Weight Loss Tips: जलद वजन कमी करण्यासाठी हे सोपे घरगुती उपाय करून पाहा, एका आठवड्यात फरक दिसून येईल!
वजन कमी करण्याच्या टिप्स आयुर्वेदात कडुनिंबाचा उपयोग अनेक आजार दूर करण्यासाठी केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरीर निरोगी ठेवण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी कडुनिंबाचा रस खूप उपयुक्त आहे.
तज्ज्ञांच्या मते, कडुलिंबाच्या काढ्याने मुरुम, खाज सुटणे आणि त्वचेशी संबंधित इतर आजारही बरे होतात.
एवढेच नाही तर कडुनिंबाच्या पानांपासून तयार केलेले आयुर्वेदिक सरबत किडनी आणि यकृताच्या समस्यांवरही मदत करते.
कडुलिंबाची पाने त्यांच्या अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहेत.
कडुलिंबाच्या रसाचे नियमित सेवन केल्याने चयापचय सुधारण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यास मदत होते.
कडुलिंबाचा डिटॉक्स बनवण्यासाठी तुम्हाला कडुलिंबाची पाने, आले, मध, लिंबाचा रस, काळी मिरी आणि पाणी लागेल. सर्वप्रथम कडुलिंबाची ताजी पानं स्वच्छ करून पाण्यात उकळा.
चांगली उकळी आल्यावर चवीनुसार आले आणि काळी मिरी घाला.
आता गॅस बंद करा आणि त्यात लिंबाचा रस पिळून मध मिसळा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. ( फोटो सौजन्य:unsplash.com)