मालदीव ट्रीप करायचीय, पण खर्च परवडतं नाहीय? मग भारतातील Mini Maldives ला नक्की भेट द्या...
जर तुम्हाला कमी पैशात मालदीवला (Maldives Tour) जायचे असेल तर तुम्हाला भारताबाहेर जाण्याचीही गरज नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालदीवचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला उत्तराखंड गाठावं लागेल. उत्तराखंडमधील टिहरी धरणावर मालदीव सारखंच अतिशय सुंदर ठिकाण आहे.
हे ठिकाण मिनी मालदीव म्हणून ओळखलं जातं. हे ठिकाण येथील निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
मालदीवमधील पाण्याच्या मधोमध हे तरंगणाऱ्यां घरांप्रमाणेच येथेही पाण्यावर तरंगणारी घरं बनवलेली आहेत. याला फ्लोटिंग हाऊस किंवा इको रूम असंही म्हणतात.
हे मिनी मालदीव पाहून तुम्हाला मालदीवला गेल्यासारखंच वाटेल. येथे तुम्हाला निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येईल.
येथे तुम्ही खास बोटिंग, पॅरासेलिंग, जेट स्कीइंग यांसारख्या वॉटर स्पोर्टसचाही आनंद घेऊ शकता.
मिनी मालदीवला जाण्यासाठी विमान, रेल्वे किंवा रस्ते मार्गानेही पोहोचू शकता. डेहराडून हे येथील सर्वात जवळचं विमानतळ आहे.
तुम्ही देशाच्या कोणत्याही भागातून डेहराडूनला पोहोचू शकता आणि टॅक्सी कॅबने टिहरी धरण म्हणजेच मिनी मालदीव गाठू शकता.
मिनी मालदीवमध्ये फ्लोटिंग हाऊस बुक करणं खूप सोपं आहे. यासाठी तुम्ही ऑनलाइन बुकिंग करू शकता.
तुम्ही तुमच्या बजेटनुसार रूम बुक करू शकता. येथे 2 ते 3 दिवस राहण्याचा खर्च किमान 8 ते 10 हजार रुपये येईल.