Traffic Rules: कॉन्स्टेबल नाही लाऊ शकत मोठे दंड; फक्त 'यांचा' असतो अधिकार! जाणून घ्या हा नियम...
तुमच्याकडून दंड आकारण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे चलान पुस्तक किंवा ई-चलान मशीन असणं आवश्यक आहे. या दोनपैकी किमान एक असल्याशिवाय ते तुमच्याकडून दंड आकारू शकत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदंड आकारताना वाहतूक पोलिसाला गणवेशात राहणं बंधनकारक आहे. त्याच्या गणवेशावर त्याचा बॅज नंबर आणि त्याचं नाव असलंच पाहिजे. जर त्यांच्याकडे गणवेश नसेल तर तुम्ही पोलीस कर्मचाऱ्याला त्याचं ओळखपत्र दाखवण्यास सांगू शकता.
ट्रॅफिक पोलिसांचा हेड कॉन्स्टेबल तुमच्याकडून केवळ 100 रुपयांचा दंड वसूल करू शकतो. त्याहून अधिक दंड फक्त वाहतूक अधिकारी (एएसआय किंवा एसआय) लाऊ शकतात. केवळ ASI किंवा SI 100 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे चलान कापू शकतात.
ASI, SI आणि इन्स्पेक्टर यांना दंड लावण्याचा अधिकार आहे. ट्रॅफिक कॉन्स्टेबल हे फक्त त्यांच्या मदतीला असतात. त्यांना कुणाच्या गाडीची चावी काढण्याचा किंवा गाडीच्या टायरमधील हवा काढण्याचा अधिकार नाही. ते तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने बोलूही शकत नाहीत.
जेव्हा ट्रॅफिक कॉन्स्टेबल तुमच्या वाहनाची चावी काढतो, तेव्हा तुम्हाला त्या घटनेचा व्हिडिओ बनवण्याचा सल्ला दिला जातो. हा व्हिडीओ तुम्ही त्या भागातील पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर दाखवू शकता आणि त्यांची तक्रार करू शकता.