Independence Day 2025: स्वातंत्र्य दिन 2025 साठी; 10 भन्नाट कार्यक्रम!

10 आश्चर्यकारक कार्यक्रमांच्या यादीसह 2025 चा स्वातंत्र्यदिन साजरा करा! या वर्षीचा तुमचा स्वातंत्र्यदिन अद्भुत आणि मजेदार बनवा.

Children experiencing Speech , Dance and Flag Making

1/10
1. स्वातंत्र्य सैनिकांचे नारे किंवा भाषण स्पर्धा या स्पर्धेत सहभागी एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाची माहिती गोळा करून त्याच्या भूमिकेत छोटे भाषण लिहू शकतात. त्या भाषणातून त्या व्यक्तीचा संघर्ष, ध्येय आणि महत्त्वाचा प्रसंग सांगावा. त्यानंतर हे भाषण लोकांसमोर किंवा परीक्षकांपुढे सादर केलं जाऊ शकतं. हे एक प्रकारे इतिहास, अभिनय आणि वक्तृत्व यांचं सुंदर मिश्रण आहे.
2/10
2. देशभक्तीची कविता आणि गोष्ट सांगण्याचा कार्यक्रम सोसायटीत, शाळेत किंवा ग्रंथालयात एक छोटं मंच किंवा "कथा सांगण्याचा कोपरा" तयार करा. सहभागी 2-3 देशभक्तीपर कविता, स्वातंत्र्य लढ्यातील कथा किंवा एखाद्या नेत्यानं दिलेलं भाषण वाचू शकतात. आजच्या सामाजिक अडचणींवर आधारित कविता/कथा देखील सांगता येतील.
3/10
3. "राष्ट्रीय चिन्ह शोधा" – एक मजेशीर खेळ या खेळात भारताच्या राष्ट्रीय चिन्हांवर आधारित काही सूचनांचा उपयोग करून लोकांना एकमेकांपासून पुढच्या ठिकाणी नेलं जातं. शेवटची सूचना झेंडावंदनाच्या ठिकाणी पोहोचवेल. लहान मुलांसाठी हा शिक्षण आणि खेळ एकत्र असलेला कार्यक्रम असेल.
4/10
4. वादविवाद स्पर्धा लोकशाहीमध्ये नागरिक म्हणून जबाबदाऱ्या समजून घेण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त आहे. वयोगटानुसार भाग घेणाऱ्यांचे गट पाडा आणि त्यांना विविध विषय द्या, जसे – “जुनी स्मारकं जपणं महत्त्वाचं की नवीन सोयीसुविधा तयार करणं?” विद्यार्थ्यांनी माहिती शोधून आपलं मत मांडावं.
5/10
5. “भारतीय चव” – पाककृती स्पर्धा या उपक्रमात भारताच्या विविध राज्यांमधून एकेक गट निवडावा. त्या राज्यातील एक प्रसिद्ध पदार्थ घरी बनवून आणावा. कार्यक्रमाच्या दिवशी एक फूड फेअर ठेवावी, जिथे लोक त्या-त्या भागातील पदार्थांची चव घेऊ शकतील आणि त्या राज्याबद्दल जाणून घेतील.
6/10
6. “स्वातंत्र्य दिन विशेष” – वर्तमानपत्र प्रकल्प या प्रकल्पात सहभागी एक छोटं ‘न्यूज रूम’ तयार करतील आणि एक विशेष स्वातंत्र्य दिनासाठीचं छोटं वर्तमानपत्र बनवतील. त्यामध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या गोष्टी, सैनिकांशी मुलाखती, देशभक्तीवर कोडी, मुलांची चित्रं, आणि ऐतिहासिक घटना यांचा समावेश करता येईल.
7/10
7. झेंडा तयार करण्याचा उपक्रम लहान मुलांना झेंड्याचं महत्त्व समजावं यासाठी क्राफ्ट पेपर, रंग, आणि चिकटवण्याचं साहित्य देऊन त्यांनी स्वतःचा तिरंगा तयार करावा. त्याचबरोबर घरातल्या वस्तूंमधून झेंडा तयार करण्याचं आव्हानही द्या – याने त्यांच्या कल्पकतेला चालना मिळेल.
8/10
8. स्वातंत्र्य दिनावर आधारित प्रश्नमंजुषा स्वातंत्र्य लढा, नेते, घटना यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करा. वेगवेगळ्या वयोगटासाठी वेगळे प्रश्न तयार करा आणि छोट्या बक्षिसांचं आयोजन करा. याने देशाच्या इतिहासाची माहिती समजून घेण्यात मदत होईल.
9/10
9. कला आणि सादरीकरण देशातील पारंपरिक नृत्य आणि आधुनिक नृत्य यांचं संमिश्र सादरीकरण ठेवा. त्याशिवाय, देशभक्तीवर कविता, देशाबद्दलची स्वप्नं, किंवा आपले आदर्श नेते यावर आधारित मांडणी केली जाऊ शकते. यातून मुलांना स्वतः व्यक्त करण्याची संधी मिळेल.
10/10
10. “माझ्या स्वप्नातलं भारत” – भविष्याला पत्र विद्यार्थ्यांनी स्वतःला 10 -24 वर्षांनंतरचं पत्र लिहावं, ज्यामध्ये भारतासाठीची स्वप्नं, अपेक्षा, आणि त्यांच्या भावना असाव्यात. काही चित्रं, फोटो किंवा भविष्यातील भाकितंही जोडावी. हे सर्व एका छोट्या पेटीत ठेवून नंतर उघडण्यासाठी ठराविक वर्ष द्यावं.
Sponsored Links by Taboola