तोंडाचा वास दूर ठेवण्यासाठी ५ घरगुती उपाय!
तोंडातून येणारा दुर्गंध हा अनेकांचा रोजचा त्रास होतो. यामुळे आत्मविश्वास कमी होतो, लोकांशी बोलताना अडचण निर्माण होते.
तोंडाचा वास
1/10
काही सोप्पे घरगुती उपाय अवलंबून तुम्ही तोंडाचा वास नैसर्गिकरित्या दूर करू शकता.
2/10
१. तुळशीची पाने चघळा: तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ताजी तुळशीची ४-५ पाने दररोज सकाळी चघळल्याने तोंडातील बॅक्टेरिया मरतात आणि तोंडातील वास कमी होतो.
3/10
२. लवंग चघळा: लवंग ही एक नैसर्गिक डिऑडरंटसारखी काम करते. लवंग चघळल्याने तोंडातील दुर्गंध नष्ट होतो आणि ताजेपणा जाणवतो. कामावर जाताना किंवा जेवणानंतर लवंग चघळणं फायदेशीर ठरतं.
4/10
३. पाणी भरपूर प्या: तोंड कोरडं राहिलं की वास येतो. त्यामुळे दररोज किमान ८-१० ग्लास पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे. पाण्यामुळे तोंडातील अन्नकण, बॅक्टेरिया साफ होतात.
5/10
४. दालचिनीचा वापर करा: दालचिनीमध्ये अँटीसेप्टिक घटक असतात. १ कप पाण्यात १ तुकडा दालचिनी उकळा, गार झाल्यावर गुळण्या करा. यामुळे तोंडातील वास दूर होतो आणि तोंड स्वच्छ राहतो.
6/10
५. कोथिंबिरीचा रस: थोडीशी ताजी कोथिंबीर वाटून त्याचा रस काढा. तो रस पाण्यात मिसळून गुळण्या केल्यास तोंडातील दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. हे नैसर्गिक माउथवॉशसारखं काम करतं.
7/10
त्याचप्रमाणे दिवसातून दोनदा नियमित ब्रश करा.
8/10
तुमची जीभ दाताप्रमाणेच स्वच्छ ठेवा.
9/10
डेंटल फ्लॉस वापरून दातात अडकलेले अन्नकण काढा.
10/10
नियमित डेंटिस्टकडून दातांची तपासणी करा. (टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 16 Jul 2025 09:58 AM (IST)