Marks On Face : चेहऱ्यावर चष्म्यामुळे डाग पडले आहेत? करा 'हे' घरगुती उपाय
एक काळ असा होता की, एका वयानंतरच चष्मा लावला जायचा. याचे कारण चांगले जेवण आणि पद्धतशीर जीवनशैली होती
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण आज काळ बदलला आहे. आजच्या काळात बिघडलेली जीवनशैली आणि बाहेरचे चुकीचे खाणे यामुळे लोकांच्या डोळ्यांवर थेट परिणाम होत आहे. यासोबतच मोबाईलच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांची दृष्टीही कमी होत चालली आहे.
मोबाईलमधून निघणाऱ्या किरणांमुळे लहान वयातच मुलांची दृष्टी क्षीण होत आहे, त्यामुळे लहान वयातच मुलांना चष्मा लावावा लागत आहे.
चष्मा सतत लावावा लागतो तेव्हा चेहऱ्यावर खुणा दिसू लागतात. काही काळानंतर या खूणा खूपच कुरूप दिसू लागतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला हे डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
चेहऱ्यावरील चष्म्याचे डाग दूर करण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेलची मदत घेऊ शकता. यासाठी कोरफडीचे जेल एका कॉटन बॉलमध्ये घ्या आणि दररोज रात्री झोपण्यापूर्वी डाग पडलेल्या भागावर लावा. नंतर काही वेळ हलक्या हातांनी मसाज करा आणि सकाळी धुवा.
कच्च्या टोमॅटोचा रस चष्म्यावरील डाग दूर करण्यासाठी देखील वापरता येतो. यासाठी एका टोमॅटोचा रस काढून गाळून घ्या. नंतर हा रस डाग पडलेल्या भागावर लावा आणि अर्धा तास सोडा. यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा.
चष्म्याचे डाग घालवण्यासाठी संत्र्याच्या सालीचाही वापर केला जाऊ शकतो. यासाठी संत्र्याची साल घेऊन बारीक वाटून घ्या. त्यानंतर या पेस्टमध्ये गुलाबजलाचे काही थेंब मिसळा आणि डाग पडलेल्या भागावर लावा. त्यानंतर हलक्या हातांनी दोन ते तीन मिनिटे मसाज करा आणि अर्ध्या तासानंतर चेहरा धुवा.
चष्म्यावरील डाग दूर करण्यासाठी गुलाबजलाचीही मदत घेतली जाऊ शकते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी कापसाचा गोळा गुलाब पाण्यात बुडवून अर्धा तास डाग पडलेल्या भागावर ठेवा. यामुळे काही दिवसातच गुण येईल.
चष्म्याचे डाग दूर करण्यासाठी तुम्ही काकडीचा रस देखील वापरू शकता. यासाठी काकडी किसून त्याचा रस काढा. त्यानंतर हा रस बोटाने डाग पडलेल्या जागी लावा आणि रात्रभर असेच राहू द्या. ही प्रक्रिया काही दिवस पुन्हा करा.
बटाट्याचा रस देखील डाग घालवण्यासाठी वापरता येतो. यासाठी कच्चा बटाटा बारीक करून त्याचा रस काढा. नंतर हा रस कापसाने डाग पडलेल्या भागावर लावा. एक किंवा दोन तास तसंच राहू द्या, नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा.