Thyroid Symtomps : थायरॉईडमुळे शरीरात 'हा' त्रास जाणवतो? नेमकं कारण जाणून घ्या!

Thyroid Symtomps : थायरॉईड बिघडल्यास शरीरात अनेक प्रकारचे त्रास जाणवू लागतात. यासाठी वेळीच काळजी घ्या.

Continues below advertisement

Thyroid Symtomps

Continues below advertisement
1/11
थायरॉईड ही शरीरातील एक महत्त्वाची ग्रंथी आहे जी हार्मोन्स आणि मेटाबॉलिझम नियंत्रित करण्यास मदत करते.
2/11
पण जेव्हा या ग्रंथीचं संतुलन बिघडतं, तेव्हा शरीरात अनेक प्रकारचे त्रास जाणवू लागतात.
3/11
थायरॉईडच्या समस्येमुळे फक्त वजन वाढणे किंवा मूड स्विंग्स होणे इतकंच नाही तर, मांसपेशींमध्ये दुखणे, सांध्यांमध्ये कडकपणा जाणवणे किंवा गळ्यात वेदना जाणवू लागतात.
4/11
कधी कधी या वेदना जबड्यात किंवा कानापर्यंत पसरू शकतात. थायरॉईडचं संतुलन बिघडल्यास मांसपेशी कमकुवत होऊ शकतात आणि थकवा जाणवू शकतो.
5/11
हायपोथायरॉईडिझममध्ये मांसपेशी कठीण आणि दुखर्‍या वाटतात.
Continues below advertisement
6/11
थायरॉईडच्या त्रासामुळे पाठ, छाती किंवा खांद्यांमध्येही वेदना होऊ शकतात. छातीतील वेदना गंभीर असतात, म्हणून अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
7/11
थायरॉईडची समस्या ओळखण्यासाठी वजनातील बदल, मूड स्विंग्स, भूक कमी-जास्त होणे आणि गळ्यात सूज यांसारख्या लक्षणांकडे लक्ष देण गरजेचं आहे.
8/11
रक्तातील TSH, T3 आणि T4 या चाचण्यांद्वारे थायरॉईडची स्थिती ओळखता येते.
9/11
थायरॉईडशी संबंधित वेदना कमी करण्यासाठी केवळ औषधोपचार पुरेसे नाहीत, तर योग्य आहार, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीत बदल गरजेचा असतो.
10/11
जर तुम्ही वेळीच उपचार घेतल्यास वेदना कमी होऊ शकतात आणि आरोग्याची गुणवत्ता सुधारु शकते.
11/11
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Sponsored Links by Taboola