Travelling Tips : प्रवास करताना निरोगी आणि उत्साही राहण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा, प्रवास होईल मजेदार
प्रवास करताना आरोग्याची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. प्रवासादरम्यान तुमची तब्येत बिघडली तर सहलीची सगळी मजाच निघून जाते. मात्र, प्रवास करताना लोक अनेकदा बाहेरच्या काही गोष्टी खातात. ज्याचे सेवन त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत, प्रवास करताना काही खाद्यपदार्थ टाळून तुम्ही सहलीचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसहलीच्या उत्साहामुळे, बहुतेक लोक आहाराकडे लक्ष देत नाहीत. अशा परिस्थितीत, अर्थातच प्रवास करताना तुम्ही खाण्याबाबत काही नियम पाळणे गरजेचे आहे. प्रवासादरम्यान काही गोष्टींचे सेवन न केल्याने तुम्ही आजारी पडण्यापासून स्वतःचा बचाव करू शकता. म्हणूनच, प्रवासासाठी काही खास टिप्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
समोसे, पकोडे, छोले भटुरे असे तेलकट पदार्थ खाणे हानिकारक ठरू शकते. या गोष्टींचे सेवन केल्याने तुमचे आरोग्य बिघडण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रवास करताना तळलेल्या पदार्थांपासून दूर राहणे चांगले.
मांसाहाराचे शौकीन असलेले बहुतेक लोक प्रवासाच्या ठिकाणच्या प्रसिद्ध मांसाहारी पदार्थाची चव घ्यायला विसरत नाहीत. पण प्रवासात नॉनव्हेज खाल्ल्याने पचनाचा त्रास होऊ शकतो. याशिवाय मळमळ आणि उलट्या होण्याचीही शक्यता असते.
प्रवास करताना, काही लोक निरोगी आहाराचे पालन करण्यासाठी ऑम्लेट आणि फ्लेवर्ड दूध वापरतात. पण प्रवास करताना या गोष्टी पचवणं सोपं नसतं. त्यामुळे सहलीदरम्यान सहज पचणारे हलके अन्न खाणे उत्तम.
काही लोक सहलीचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी दारू पिण्यास मागेपुढे पाहत नाहीत. मात्र, प्रवासात मद्यपान केल्याने डिहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्रवासात दारू पिणे टाळा आणि आरोग्यदायी पेयांचे सेवन करा.
प्रवास करताना शरीर हायड्रेट ठेवण्याची गरज आहे. अशा स्थितीत प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवायला विसरू नका आणि वेळोवेळी पाणी पित राहा. यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या होणार नाही आणि प्रवासादरम्यानही तुम्हाला फ्रेश वाटेल. मात्र, सहलीत पोटभर जेवू नये. यामुळे तुम्हाला अन्न पचण्यास त्रास होऊ शकतो.
प्रवासादरम्यान पांढऱ्या ब्रेडपासून बनवलेले सँडविच कधीही खाऊ नका. व्हाईट ब्रेड तुमची एनर्जी लेव्हल झपाट्याने वाढवतेच पण तुम्हाला अस्वस्थ देखील करू शकते. त्यामुळे प्रवास करताना टोस्ट किंवा सँडविचचे सेवन अजिबात करू नका.
तुम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावर जेवत आहात ते पदार्थ ताजे असतील याची विशेष काळजी घ्यावी लागेल. आपण अन्नाचा वास घेऊन ते तपासू शकता. ब-याचदा मोठ्या हॉटेल्समध्येही शिळे अन्न दिले जाते, त्यामुळे तुम्हाला ताजे जेवण दिले जाईल याची विशेष काळजी घ्या. अन्न ताजे नसल्यास, तुमचे आरोग्य बिघडू शकते.
प्रवासादरम्यान तुम्हाला अनेक ठिकाणी कोल्ड्रिंक्स आणि चहा , काॅफी मिळते. तुम्ही ते टाळून वाटेत नारळपाणी प्यावे. हे तुम्हाला निरोगी आणि ताजेतवाने ठेवण्यास मदत करेल. यासोबतच ज्यूस किंवा कोणतेही पेय प्यायल्यास बर्फ अजिबात वापरू नका. यामुळे तुमची तब्बेत खराब होऊ शकते.