Onion : कांदा कापताना डोळ्यात पाणी आल्याने त्रास होतोय? या सोप्या टीप्स नक्की लक्षात ठेवा
अनेकांना कांदा चिरणं हे फार अवघड काम वाटतं. कांदा कापताना डोळ्यात येणाऱ्या पाण्यामुळे अनेक जण कांदा कापणं टाळतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकांदा चिरताना डोळ्यातून अश्रू येतात आणि जळजळही होते. मात्र, जर तुम्हाला ते कापण्याची योग्य पद्धत माहित असेल तर तुम्हाला हे काम अवघड वाटणार नाही.
जाणून घेऊया कोणताही त्रास सहन न करता कांदा कसा चिरावा.
तसेच जर कांदा काळा पडला असेल तर तो खराब होण्याची शक्यता जास्त असते.
कांदा चिरण्यापूर्वी त्याची वरची आणि खालची टोके चिरुन घ्या. त्यानंतर हळूहळू कांदा सोलावा.
कांदा चिरण्यापूर्वी कांदा धुवून घ्यावा. आधी कांदा सोलून घ्यावा त्यानंतर तो धुवाव.
मग तो चिरावा म्हणजे कांद्याची त्वचा त्यामुळे मऊ होण्यास मदत होते.
कांदा सोलल्यावर तो धुवून पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवा.
नंतर त्यांना एक एक करून बारीक कापून घ्या.
यामुळे कांदा कापताना तुम्हाला होणार त्रास कमी होण्यास मदत होते.