People Who Should Not Eat Papaya: या लोकांनी पपईपासून दूरच राहा! जाणून घ्या …
People Who Should Not Eat Papaya: पपई हे खूप निरोगी फळ असलं तरी काही लोकांसाठी ते हानिकारक ठरू शकतं. प्रेग्नंट महिला, हृदयरोगी, किंवा पोटाच्या समस्या असलेल्या लोकांनी पपई कमी प्रमाणात खावी.
Continues below advertisement
People Who Should Not Eat Papaya
Continues below advertisement
1/7
पपई खाल्याने इम्युनिटी वाढते, सूज कमी होते आणि त्वचा निरोगी राहते, पण पपई सर्वांसाठी सुरक्षित नाही. काही लोकांनी ते कमी प्रमाणात खावे किंवा अजिबात खाऊ नये.
2/7
गरोदर महिलांनी कच्ची पपई खाणे टाळावे. त्यात लेटेक्स आणि पपेन असतं , जे गर्भाशयाला आकुंचन देऊ शकते आणि डिलिव्हरीच्या वेळी धोका वाढवू शकतं.
3/7
पपईमध्ये काही कंपाऊंड असतात जे सेन्सिटिव्ह लोकांच्या हृदयाच्या ठोक्यावर परिणाम करू शकतात. जर तुमचे हृदय असामान्यपणे धडधडत असेल तर पपई खाणे टाळा.
4/7
तुम्हाला लेटेक्सची अॅलर्जी असेल तर पपई खाऊ नका. यामुळे शिंका येणे, डोळ्यातून पाणी येणे, त्वचेवर पुरळ उठणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
5/7
पपईमध्ये व्हिटॅमिन सी जास्त असल्याने त्याने किडनी स्टोनची समस्या वाढू शकतात. म्हणून, किडनी स्टोन असलेल्या लोकांनी पपई कमी प्रमाणात खावी.
Continues below advertisement
6/7
पपईमध्ये फायबर आणि पपेनचे प्रमाण जास्त असल्याने छातीत जळजळ, अॅसिड रिफ्लक्स, अल्सर किंवा आयबीएसचा त्रास वाढू शकतो. संवेदनशील पोट असलेल्या लोकांनी पपईचे सेवन कमी प्रमाणात किंवा पूर्णपणे टाळावे.
7/7
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 22 Nov 2025 04:23 PM (IST)