रात्रभर ब्रा घालणे आरोग्यासाठी फायद्याचे की हानिकारक?

शरीर झोपेत विश्रांती घेतं, त्या वेळी घट्ट कपडे किंवा ब्रा घातल्याने त्वचेला व रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो.

Continues below advertisement

ब्रा

Continues below advertisement
1/8
अनेक महिलांना असा गैरसमज असतो की रात्रभर ब्रा घालून झोपल्याने ब्रेस्टचा आकार टिकून राहतो आणि सैलपणा येत नाही.
2/8
मात्र, डॉक्टर आणि तज्ज्ञ सांगतात की हे फक्त एक myth आहे. शरीर झोपेत विश्रांती घेतं, त्या वेळी घट्ट कपडे किंवा ब्रा घातल्याने त्वचेला व रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो.
3/8
विशेषत: अंडरवायर ब्रा किंवा टाईट फिटिंग ब्रा घातल्यास छातीभोवतीचा भाग दाबला जातो, ज्यामुळे त्वचेवर लालसरपणा, खाज, चट्टे किंवा रॅशेस होऊ शकतात. काही महिलांमध्ये श्वासोच्छवासातही त्रास जाणवतो.
4/8
तज्ज्ञांच्या मते, झोपताना शरीराला आराम आणि श्वास घेण्यासाठी जागा मिळणे आवश्यक आहे.
5/8
त्यामुळे रात्रभर ब्रा न घालणे हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.
Continues below advertisement
6/8
जर कोणाला ब्रा न घालता झोपण्यात अस्वस्थ वाटत असेल, तर मऊ कॉटनची, नॉन-वायर आणि सैल फिट असलेली स्लीप ब्रा वापरणे उत्तम ठरते.
7/8
तसेच, रात्री ब्रा न घातल्याने त्वचेला हवेचा स्पर्श मिळतो, घाम कमी येतो आणि त्वचेवरील बुरशीजन्य संसर्ग टाळता येतो.
8/8
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola