Teddy Day Celebration : टेडी हे नाव कस पडलं माहितीये का तुम्हाला ; जाणून घ्या काय आहे या मागचा इतिहास
Teddy Day Celebration : टेडी हे नाव कस पडलं माहितीये का तुम्हाला जाणून घ्या काय आहे या मागचा इतिहास
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात व्हॅलेंटाइन सप्ताह साजरा केला जातो, ज्यामध्ये प्रेम साजरे करण्यासाठी वेगवेगळे दिवस असतात. (Photo Credit : Pixabay)
1/9
या आठवड्यात रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, प्रॉमिस डे, हग डे आणि किस डे इत्यादी साजरे केले जातात. (Photo Credit : Pixabay)
2/9
व्हॅलेंटाईन आठवड्याच्या चौथ्या दिवशी टेडी डे (Teddy Day) साजरा केला जातो. टेडी बेअर हे एक प्रकारचे सॉफ्ट टॉय आहे, जे साधारणपणे मुलांना किंवा बहुतेक मुलींना आवडते. (Photo Credit : Pixabay)
3/9
पण व्हॅलेंटाईन वीकमध्ये टेडी डे (Teddy Day) का साजरा केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? (Photo Credit : Pixabay)
4/9
टेडीचा प्रेमाशी काय संबंध आहे आणि टेडी बेअरचा इतिहास काय आहे? टेडी बेअरशी संबंधित काही रंजक गोष्टी आणि माहिती जाणून घ्या. (Photo Credit : Pixabay)
5/9
टेडी अस्वल 20 व्या शतकात उद्भवले. एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट जंगलात शिकार करायला गेले होते. त्याच्यासोबत असिस्टंट होल्ट कॉलियर होते.(Photo Credit : Pixabay)
6/9
कॉलीनने जखमी काळ्या अस्वलाला पकडून झाडाला बांधले. पण अस्वलाला जखमी अवस्थेत पाहून राष्ट्रपतींचे हृदय द्रवले आणि त्यांनी अस्वलाला मारण्यास नकार दिला.(Photo Credit : Pixabay)
7/9
राष्ट्रपतींच्या उदारतेचे चित्र ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते, ते व्यंगचित्रकार क्लिफर्ड बेरीमन यांनी रेखाटले होते.(Photo Credit : Pixabay)
8/9
वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले चित्र पाहून उद्योगपती मॉरिस मिचटॉम यांनी अस्वलाच्या आकारात एक खेळणी बनवली, ज्याची रचना त्यांच्या पत्नीने केली आणि या खेळण्याला टेडी असे नाव देण्यात आले.(Photo Credit : Pixabay)
9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)
Published at : 10 Feb 2024 05:15 PM (IST)