Teddy Day 2023 : प्रेमीयुगुलांसाठी खास आहे 'टेडी-डे', आपल्या जोडीदाराला 'असं' करा इम्प्रेस
व्हॅलेंटाईन वीकमध्ये रोज डे, प्रपोज डे आणि चॉकलेट डेनंतर टेडी डे साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App10 फेब्रुवारी हा दिवस टेडी-डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना गिफ्ट म्हणून टेडी बिअर देतात.
खासकरुन मुली आणि लहान मुलांचा लाडका असलेला टेडी आज जास्त खास असतो. कारण आज प्रेमी आपल्या प्रेयसीला टेडी बिअर गिफ्ट करतो.
बाजारात देखील वेगवेगळ्या प्रकारचे टेडी सध्या विक्रीसाठी आले असून टेडीची मोठी उलाढाल प्रत्येक वर्षी होत असते.
टेडी-डे ला अधिक खास बनवण्यासाठी तसेच तुम्ही आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी टेडीने आपल्या घराला सजवू शकता.
बाजारात अनेक रंगांचे टेडी उपलब्ध आहेत. यात लाल, गुलाबी आणि पांढऱ्या रंगांचे टेडी सर्वात आवडते असतात.
लाल रंग प्रेमाचं प्रतिक मानला जातो, त्यामुळे लाल रंगाचा टेडी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला देऊ शकता.
गुलाबी रंग खासकरुन मुलींना खूप आवडतो, त्यामुळे गुलाबी रंगाचा टेडी देखील तुम्ही भेट करु शकता.