आला उन्हाळा त्वचेला आता संभाळा , सनस्क्रिन लोशन वापरताय? मग 'ही' काळजी घ्या
आपल्या चेहऱ्याला सूर्याच्या तीव्र किरणांपासून वाचवण्यासाठी सनस्क्रिनचा वापर केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउन्हाळ्याचे दिवस असो वा हिवाळ्याचे, सनस्क्रिन लोशनचा वापर हा प्रत्येक ऋतूमध्ये केला जातो
सनस्क्रिन लोशन रोज वापरले तर तीव्र उन्हापासून आणि धुळीपासून तुमचे संरक्षण होऊ शकते.
घरात असतानाही तुम्ही सनस्क्रिनचा वापर केला पाहीजे. घरातील खिडकीतून देखील सूर्याची किरणे येतात. त्यामुळे घरात असतानाही सनस्क्रिनचा वापर करावा. तसेच तुम्ही कारने प्रवास करत असाल तरीही थोड्या प्रमाणात सनस्क्रिनचा वापर करा.
SPF चे रेटिंग सूचित करते की , एखादे सनस्क्रिन सुर्यप्रकाशापासून त्वचेचे किती चांगले संरक्षण करते. त्यामुळे आपल्या चेहऱ्याला सूट होणारेच वापरावे. तसेच योग्य त्या SPF चेच सनस्क्रिन वापरावे.
सनस्क्रिन चेहऱ्यावर लावताना मान, कानाच्या मागच्या भागाला देखील सनस्क्रिन लावावे. घरातून बाहेर पडण्याआधी साधारण 15 ते 20 मिनीट आधी सनस्क्रिन चेहऱ्याला लावली पाहीजे.
उन्हात जास्त वेळ काम करत असाल तर दर दोन तासाने सनस्क्रिन लावावी. केवळ चेहऱ्याला सनस्क्रिन न लावता शरीराच्या इतर उघड्या भागांनाही सनस्क्रिन लावावी.
जे मेकअप करतात त्यांनीही सनस्क्रीन वापरावे. डोळ्यांखाली सनस्क्रीन लावा आणि बाहेर जा, त्यामुळे डोळ्यांखाली आयबॅग येत नाहीत.
तुम्ही लहान मुलांनाही सनस्क्रिन लावू शकता. अशा काही सनस्क्रिन बाजारात उपलब्ध आहेत, ज्या केवळ लहान मुलांसाठीच वापरल्या जातात.
केमिकल सनस्क्रिनचा वापर करत असाल तर त्या आधी तुम्ही माॅइश्चरायझर लावायला हवे. मात्र जर मॅट सनस्क्रिन लावत असाल तर माॅइश्चरायझर लावण्याची गरज नाही.