Skincare Tips: हिवाळ्यामुळे तुमची स्किन ड्राय होते आहे का? रात्री लावा 'ही' क्रीम, त्वचा होईल तजेलदार आणि ड्रायनेस होईल दूर!
Skincare Tips:हिवाळा सुरू झाला की वातावरणात गारवा जाणवतो आणि त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसू लागतो. त्वचा कोरडी पडणे, खाज येणे, निस्तेज होणे आणि कोरडेपणा अशा अनेक समस्या निर्माण होतात.

हिवाळा
1/7
घराबाहेरचं वातावरण, गरम पाण्याचा अधिक वापर आणि त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास आपलं नैसर्गिक सौंदर्य हरवू शकतं. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.
2/7
रात्री झोपण्यापूर्वी योग्य स्किनकेअर रुटीन पाळणं अत्यंत गरजेचं आहे. दिवसभर केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरल्यानंतर रात्री स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा, ज्यामुळे त्वचेवरील घाण आणि प्रॉडक्ट्सचे अवशेष दूर होतील.
3/7
नाईट क्रीम बनवण्यासाठी एलोव्हेराचा गर, बदाम तेल, गुलाबपाणी, ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलची अवशष्क्त आहे.
4/7
एका भांड्यात एलोव्हेराचा गर घ्या, त्यात गुलाबपाणी, बदाम तेल, ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल घालून नीट मिक्स करा.
5/7
ही क्रीम दररोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेवरील कोरडेपणा आणि सुरकुत्या कमी होतील.
6/7
ही क्रीम त्वचा खोलवर हायड्रेट करते, मॉइश्चराइझ करते आणि खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्यास मदत करते.
7/7
(टीप: वरील माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही.)
Published at : 13 Nov 2025 03:43 PM (IST)