Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Skin Care Tips : प्रदूषणामुळे चेहऱ्याचं नुकसान होतंय? धुळीपासून त्वचेची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर
जर तुम्हीही त्वचेच्या समस्यांनी त्रस्त असाल तर तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेला हानिकारक हवा आणि प्रदूषकांपासून वाचवण्यासाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जेणेकरून प्रदूषणाचा तुमच्या त्वचेवर परिणाम होणार नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्याला हळूहळू सुरुवात होत आहे. वायू प्रदूषणही वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ आरोग्यच नाही तर त्वचेशी संबंधित अनेक समस्या दिसू लागल्या आहेत. या ऋतूमध्ये बहुतेकांना चेहऱ्यावर पुरळ येणे, खाज येणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
जर तुम्हीही अशा प्रकारच्या समस्येने त्रस्त असाल, तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेचे हानिकारक हवा आणि प्रदूषकांपासून संरक्षण करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जेणेकरून प्रदूषणाचा तुमच्या त्वचेवर परिणाम होणार नाही.
हवेच्या प्रदूषणात अनेक हानिकारक घटक आढळतात, जे त्वचेला नुकसान पोहोचवण्यासाठी पुरेसे असतात. अशा परिस्थितीत प्रदूषण विरोधी फेस मास्क वापरल्याने तुमचा चेहरा वाचू शकतो. यामुळे चेहऱ्यावरील खडबडीतपणा दूर होईल.
प्रदूषणामुळे चेहऱ्याचा रंग बिघडतो. अशा परिस्थितीत दिवसातून किमान दोनदा चेहरा व्यवस्थित स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेस वॉश लावा आणि चेहऱ्याला पूर्णपणे मसाज करा.
बदलत्या हवामानात त्वचा कोरडी होते, त्यामुळे मॉइश्चरायझर वापरणे कधीही बंद करू नका. याबरोबरच प्रदूषण टाळण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करणे आवश्यक आहे. घराबाहेर पडतानाही सनस्क्रीनचा वापर करावा.
जर तुम्हाला तुमच्या त्वचेला प्रदूषणापासून वाचवायचे असेल, तर जेव्हाही तुम्ही घराबाहेर पडाल तेव्हा चेहरा झाका. यामुळे धूळ आणि घाणीपासून चेहऱ्याचे संरक्षण होईल आणि त्यातील ओलावाही कायम राहील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.