Beauty Tips : सुंदर त्वचा आणि चमकणारा ग्लो हवाय? 'या' 7 टिप्स वापरून पाहा
सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवणं फार कठीण नाही. काही आरोग्यदायी सवयी तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आणून तुमची त्वचा तजेलदार बनवतील, कसं ते वाचा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुमची त्वचा हायड्रेट तर चेहऱ्यावर आपोआप ग्लो येऊन तुम्ही सुंदर दिसता. त्यामुळे भरपूर पाणी पिऊन चेहरा हायड्रेट ठेवा. यामुळे मुरुमांची समस्या उद्भवणार नाही. त्यामुळे दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी प्या.
व्यायाम केल्याने रक्ताभिसरण योग्यप्रकारे होते. यामुळे त्वचेच्या मृत पेशींना जीवदान मिळते आणि तुमचा चेहरा तजेलदार दिसतो.
सुंदर आणि ग्लोईंग त्वचा हवी असेल तर ताणतणाव दूर करा. तुम्ही तणाव घेतल्यास त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. त्यामुळे स्वतःला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या निरोगी ठेवा, यामुळे त्वचा सुधारण्यास मदत होईल.
सुंदर दिसण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त आहार घेणं आवश्यक आहे. तुमच्या आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. तेलकट आणि फास्ट फूड खाणं टाळा.
त्वचा दुरुस्त करण्यासाठी पुरेशी झोप घेणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे किमान सात ते आठ तास पुरेशी झोप घ्या, यामुळे चेहऱ्यावर चमक येईल.
सुंदर दिसण्यासाठी, त्वचेची चांगली निगा राखणंही गरजेच आहे. यासाठी तुम्ही दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ धुतला पाहिजे. दर आठवड्याला स्कीन एक्सफोलिएट करण्यासाठी स्क्रब करा. चेहऱ्यावर नैसर्गिक पदार्थांपासून तयार केलेला मास्क लावा.
सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमच्या त्वचेचं संरक्षण करण्यासाठी नेहमी सनस्क्रीन वापरा. यासाठी 30 किंवा त्याहून जास्त SPF असलेली सनस्क्रीन वापरा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.