Skin Care Tips For Men : पुरुषांच्या चेहऱ्यासाठी स्किन केअर टिप्स
Men Skincare Tips : केवळ महिलांनीच नाही तर पुरुषांनीही त्वचेची काळजी घेण्याची आवश्यता आहे. अशा काही गोष्टी आहे, ज्या पुरुषांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी अतिशय गरजेच्या आहेत, जाणून घेऊया...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचांगली त्वचा आणि हॅण्डसम दिसण्यासाठी पुरुषांनाही सीटीएमची गरज आहे. सीटीएम म्हणजे क्लींजिंग, टोनिंग आणि मॉईश्चरायजिंग. क्लींजिंग, टोनिंग आणि मॉईश्चरायजिंग नियमित केल्याने त्वचा चमकदार बनते.
दाढीमुळे तुमचा लूक आणखी बदलतो. परंतु दाढी कायम स्वच्छ ठेवा. वेळोवेळी ट्रिम करण्यासोबतच स्वच्छता राखणंही गरजेचं आहे.
धूम्रपानामुळे शरीराचं आतून नुकसान होतं, पण त्यासोबतच त्वचेवरही परिणाम होता. त्वचेची लवचिकता हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. कोलॅजनची निर्मिती कमी होती, ज्यामुळे सुरकुत्या येतात
स्किन केअर रुटीनमध्ये स्क्रबिंगला महत्त्वाचं स्थान आहे. त्वचेच्या छिद्रांमधील घाण, धूळ घालवण्यासाठी स्क्रबचा वापर केला जातो. शिवाय ब्लॅकहेड्स घालवण्यासाठीही याचा उपयोग होता.
चमकदार त्वचेसाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि त्वचा आतून हेल्दी बनते आणि तुम्हाला नॅचरल ग्लो मिळतो.
उन्हात घराबाहेर पडलाना सनस्क्रीन अवश्य लावून बाहेर पडा. यामुळे सूर्यातून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून तुमचं संरक्षण होईल आणि एजिंगचा प्रभाव कमी होतो.
चेहरा साबणाने धुवायचा टाळा. कारण चेहऱ्याची त्वचा शरीराच्या इतर त्वचेच्या तुलनेत नाजूक असते. त्यामुळे फेसवॉश किंवा जेल क्लिंजर वापरा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर क्रिमी फेसवॉश आणि तेलकट असेल क्लीयर क्लींजर वापरा.
स्किन केअर रुटीनमध्ये ओठांना विसरु नका. चांगल्या प्रतिचा लिप बाम लावा. उन्हात बाहेर पडण्यापूर्वी एसपीएफ असलेला लिप बाम वापरा. रात्री हायड्रेटिंग लिप बाम लावा, जेणेकडून खराब झालेले ओठ पूर्ववत होतील