Skin Care Tips : सुंदर आणि नितळ त्वचेसाठी बिअरचे 'असेही' आहेत फायदे

Beer For Skin Care : बिअर पिणं आरोग्यासाठी जरी हानिकारक असलं तरी ही त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे.

Beer For Skin Care

1/8
आपली त्वचा (Skin) सुंदर आणि चमकदार असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. सुंदर आणि नितळ त्वचा मिळवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. काही जण घरगुती उपाय करुन पाहतात, तर काही जण महागडे ब्युटी प्रोडक्ट्स वापरतात.
2/8
मात्र प्रत्येकाला पाहिजे ते परिणाम मिळतात, असं नाही. तुम्हालाही जर सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्ही बिअरचा (Beer) वापर करुन पाहा. बिअर पिणं आरोग्यासाठी जरी हानिकारक असलं तरी ही त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे.
3/8
बिअर बनविण्यासाठी होप्स या फुलाचा वापर केला जातो. या फुलामध्ये अँटी-बॅक्टीरियल, अँटी-इंफ्लिमेंटरी, अँटी-ऑक्सीडेटिव्ह, अँटी-मॅलानोजेनिक सारखे गुण असते. त्वचेसाठी आणि केसांसाठी बिअर कशी फायदेशीर आहे ते जाणून घ्या.
4/8
दररोज त्वचेवर बिअर लावल्याने त्वचा चमकदार बनते. बिअरमध्ये हायड्रोक्विनोन नावाचा पदार्थ असतो, जो हायपरपिग्मेंटेशन कमी करण्यास मदत करतो.
5/8
तुम्ही एक चमचा बिअरमध्ये एक चमचा खोबरेल तेल मिसळा. हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
6/8
तुम्ही संत्र्याचा रस आणि बिअर मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी अर्धा कप बिअरमध्ये दोन चमचे संत्र्याचा रस मिसळा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. हे कोरडे झाल्यावर त्यावर आणखी एक थर लावा. 20 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
7/8
तुम्ही बिअर आणि स्ट्रॉबेरीपासून फेस पॅक बनवूनही वापरू शकता. यासाठी तीन स्ट्रॉबेरी मॅश म्हणजे कुस्करून घ्या आणि त्यात एक टीस्पून बिअर मिसळा. आता हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. साधारण 20 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.
8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Sponsored Links by Taboola