वर्क फ्रॉम होम करताय? घरातच राहून फिट कसं रहायचं ते जाणून घ्या!
वर्क फ्रॉम होम करताना सतत एका जागी बसून काम केल्यामुळे हालचाल कमी होते आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो. पण काळजी करू नका! घरबसल्या काही साधे उपाय करून तुम्ही तंदुरुस्त आणि ऊर्जावान राहू शकता.
वर्क फ्रॉम होम
1/9
वर्क फ्रॉम होम करणाऱ्या महिलांसाठी घरातच फिट राहणं आवश्यक असतं
2/9
कारण सतत एका जागी बसून काम केल्याने शारीरिक हालचाल कमी होते.
3/9
. यासाठी दिवसाची सुरुवात साध्या स्ट्रेचिंगने किंवा प्राणायामाने करावी.
4/9
दर तासाभराने थोडं चालणं, घरकामामध्ये स्वतःला गुंतवणं, मुलांबरोबर खेळणं यामुळे शरीर सतत सक्रिय राहतं.
5/9
घरातच योगा, झुंबा किंवा ऑनलाईन वर्कआउट व्हिडिओ फॉलो करून रोज १५-३० मिनिटे व्यायाम करावा.
6/9
आहारात फळं, भाज्या, प्रोटीनयुक्त अन्न आणि भरपूर पाणी यांचा समावेश करावा.
7/9
स्क्रीन टाइम कमी ठेवणं, पुरेशी झोप घेणं आणि मानसिक तणाव टाळण्यासाठी मेडिटेशन करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
8/9
शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती राखण्यासाठी ही लहान पावलं मोठा बदल घडवू शकतात
9/9
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 28 Jul 2025 01:31 PM (IST)