Kitchen Tips : झटपट आणि उपयुक्त किचन टिप्स, घ्या जाणून
झटपट आणि उपयुक्त किचन टिप्स ज्या तुम्हाला स्वयंपाकघरात चांगला अनुभव देतील.
Kitchen Tips
1/10
शेंगादाणे पाण्याचा हात लावून भाजल्याने दाणे खमंग भाजले जातात.
2/10
खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळाचा वापर टाळावा. त्याने दूध फाटण्याची शक्यता अस
3/10
डाळी पिवळ्या दिसण्यासाठी हळद एरंडेल तेलात घालून गरम करावी. तेल गार झाल्यानंतर डाळींना चोळा.
4/10
मिठाच्या बरणीवर टिप कागद ठेवून झाकण घट्ट लावल्यास मिठाला पाणी सुटत नाही.
5/10
साखरेचा पाक केल्यानंतर पाकात साखरेचे कण परत होऊ नयेत म्हणून पाकात थोडं लिंबू पिळावं.
6/10
शिळा ब्रेड उन्हात वाळवून चुरा करून ठेवल्यास कटलेट तयार करताना त्याची चांगली चव येते.
7/10
फ्रिजरमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्याखाली प्लास्टिक पेपर ठेवावा, त्याने ट्रे चटकन निघतो.
8/10
चहाच्या भांड्याला डाग पडले असतील तर त्या भांड्याला मिठ लावून घासावं.
9/10
पालक शिजवताना तो कच्चा मिक्सरमधून वाटून फोडणीस घातल्याने त्याचा रंग कायम राहतो.
10/10
हाताला कांद्याचा वास येत असेल तर बेसन पिठ चोळून हात धुवावा.
Published at : 15 Oct 2023 05:43 PM (IST)