Health: तुमच्या शरीरात 'ही' लक्षणं दिसली तर समजा तुमचं शरीर तुम्हाला काहीतरी सांगतंय! जाणून घ्या नक्की काय...
Health: आपण रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या शरीराचे संकेत दुर्लक्षित करतो. पण शरीर हे आपल्या आरोग्याचं आरशासारखं असतं. त्याने दिलेले संकेत ओळखले, तर आजार टाळता येतात.
Continues below advertisement
Health
Continues below advertisement
1/11
वारंवार जांभाई येत असतील तर समजा शरीरात ऑक्सिजनची कमतरता आहे.पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या.
2/11
तोंडाला दुर्गंधी येत असेल तर पचनसंस्थेत काही गडबड असू शकते.आहारावर लक्ष द्या.
3/11
कानात घंटा वाजल्यासारखं वाटत असेल तर रक्तदाब वाढलेला असण्याची शक्यता असते.
4/11
केस झपाट्याने गळत असतील तर शरीरात लोहाची कमतरता आहे. आहारात हिरव्या भाज्या आणि सुका मेवा घ्या.
5/11
पाय सुजत असतील तर हृदय किंवा मूत्रपिंडाशी संबंधित समस्या असू शकते. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Continues below advertisement
6/11
रात्री पायात गोळे येत असतील तर मॅग्नेशियमची कमतरता आहे. केळी आणि ड्रायफ्रूट्सचा समावेश करा.
7/11
हाताची बोटं सुन्न होत असतील तर व्हिटॅमिन B12 ची कमतरता असू शकते. पौष्टिक अन्न सेवन करा.
8/11
गोड खायची खूप इच्छा होत असेल तर शरीर काही पोषणतत्वांची मागणी करतंय. संतुलित आहार घ्या.
9/11
वारंवार डोकेदुखी होत असेल तर शरीरात पाण्याची कमतरता असते. पुरेसं पाणी प्या.
10/11
हात-पाय थंड वाटत असतील तर रक्ताभिसरण नीट होत नाही, बी-व्हिटॅमिन किंवा झिंकची कमतरता असू शकते.
11/11
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 30 Oct 2025 05:18 PM (IST)