Side Effects of Peanuts : थंडीत शेंगदाणे खायला आवडतायत? जाणून घ्या दुष्परिणाम
थंडीच्या दिवसांत हवेतील गारवा आणि गरमागरम भट्टीतील शेंगदाणे खायला कोणाला आवडत नाही. अनेक जण तर नाश्ता किंवा तोंडात टाकण्यासाठी टाईमपास म्हणून शेंगदाण्याकडे पाहतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेंगदाण्यात असे अनेक पौष्टिक घटक असतात, जे आरोग्यासाठी उत्कृष्ट मानले जातात.
पण तुम्हाला हिवाळ्यात दिवसभर फक्त शेंगदाणे चघळण्याची सवय आहे का, तर तुम्ही ही सवय लगेच सोडली पाहिजे.
जर तुम्ही एकाच वेळी गरजेपेक्षा जास्त शेंगदाणे खाल्ले तर तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.
याशिवाय शेंगदाणे खाल्ल्याने पक्षाघात, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.
शेंगदाणे खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे दिवसा आणि संध्याकाळ तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता.
जर तुम्ही शेंगदाण्याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर शरीरात अॅलर्जीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आणि बद्धकोष्ठता, जुलाब आणि सूज येण्याची शक्यता देखील वाढते.
किमान एक मूठभर शेंगदाण्यामध्ये 170 कॅलरीज असतात, त्यामुळे दिवसभरात शेंगदाणे खा मात्र शेंगदाण्याचे अतिसेवन करू नका.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.