मेकअपसह झोपता? त्वचेवर होतात असे भयंकर परिणाम

मेकअप न काढता झोपल्याने होऊ शकतात अनेक दुष्परिणाम, लाइफटाइम रिग्रेट करण्यापेक्षा जाणून घ्या...

Side effects of sleeping with makeup

1/11
दिवसभर वापरलेला मेकअप जर झोपण्याआधी न काढता ठेवला, तर तो त्वचेसाठी घातक ठरू शकतो. मेकअपमुळे त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये धूळ व तेल साचतं आणि त्यामुळे मुरुमं, काळे डाग, ब्लॅकहेड्स यांसारख्या समस्या निर्माण होतात.
2/11
दीर्घकाळ हा सवयीनं त्वचेवर अकाली सुरकुत्या आणि वृद्धत्वाची चिन्हं दिसू लागतात.
3/11
म्हणूनच, झोपण्याआधी चेहरा व्यवस्थित धुऊन, मेकअप पूर्णपणे काढून मगच झोपणं ही त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक सवय आहे.
4/11
त्वचेची श्वसनक्रिया बंद होते : रोमछिद्रं बंद होतात आणि त्यामुळे मुरुमं, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स सहज होतात. शिवाय त्वचेचं नैसर्गिक श्वसन रोखलं जातं,
5/11
ज्यामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसते. डोळ्यांचा मेकअप काढला नाही तर डोळ्यांना संसर्ग, खाज किंवा लालसरपणा होऊ शकतो.
6/11
त्वचा निस्तेज होते : मेकअप रातभर राहिल्याने धूळ आणि प्रदूषण त्वचेत मिसळून टवटवी कमी होते.
7/11
डोळ्यांचा त्रास : मस्कारा किंवा काजळ न काढल्यास डोळ्यांना संसर्ग, खाज, लालसरपणा किंवा सूज येऊ शकते.
8/11
अकाली वृद्धत्व : मेकअपमधील केमिकल्स त्वचेवर जास्त वेळ राहिल्यास सुरकुत्या आणि बारीक रेषा लवकर दिसू लागतात. दीर्घकाळ हा सवयीनं त्वचेवर अकाली सुरकुत्या आणि वृद्धत्वाची चिन्हं दिसू लागतात.
9/11
ओठ आणि केसांवर परिणाम : लिपस्टिक लावून झोपल्यास ओठ कोरडे होतात, तर हेअरस्प्रे/जेल काढले नाही तर केस गळणे व कोंडा वाढतो.
10/11
म्हणूनच, झोपण्याआधी मेकअप नेहमी काढावा. फेस वॉश, क्लेन्सिंग मिल्क किंवा नैसर्गिक उपाय (जसे नारळ तेल/अलोवेरा जेल) वापरून चेहरा स्वच्छ धुतल्यास त्वचा निरोगी राहते.
11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Sponsored Links by Taboola