मासिक पाळीत केस धुवावे का? जाणून घ्या!
मासिक पाळी महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जिथे गर्भाशयाचे आवरण बाहेर पडते, ज्यामुळे महिलांमध्ये मासिक रक्तस्त्राव होतो.
मासिक पाळी
1/8
मासिक पाळी आल्यानंतर अनेक महिलांमध्ये काही छोट्या छोट्या बाबतीत अनेक गैरसमजुती आहेत.
2/8
मासिक पाळी महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जिथे गर्भाशयाचे आवरण बाहेर पडते, ज्यामुळे महिलांमध्ये मासिक रक्तस्त्राव होतो.
3/8
महिलांचे आरोग्य चांगले राखणे आणि मासिक पाळी विषयी जागरूकता वाढविण्यासाठी गैरसमजूतींना दूर करणे ही काळाची गरज आहे.
4/8
उशिरा किंवा चुकलेली मासिक पाळी म्हणजे गर्भवती असणे असे असू शकत नाही. पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस), जास्त वजन, चूकीचा आहार, आजार आणि ताण यांसारखे हार्मोनल असंतुलनामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते.
5/8
मासिक पाळीच्या वेळी महिलांनी त्यांच्या स्वच्छतेशी तडजोड करू नये. मासिक पाळीच्या वेळी महिला केस धुवू शकत नाहीत किंवा आंघोळ करू शकत नाहीत असे कोणतेही पुरावे आजपर्यंत सापडलेले नाहीत.
6/8
मासिक पाळीच्या वेळी व्यायाम केल्याने तुमच्या शारीरिक आरोग्याला हानी पोहोचू शकते हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा आजपर्यंत सापडलेला नाही. व्यायाम हा निरोगी शरीर आणि मनासाठी चांगला आहे आणि मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना कमी करण्यास आणि तणावमुक्त राहण्यासाठी मदत करतो.
7/8
मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती स्त्रीला अस्वच्छ किंवा अपवित्र ठरवत नाही.मासिक पाळी ही गर्भावस्था नसताना गर्भाशयाच्या अस्तराचे त्वचा बाहेर पडण्याचा शरीराचा नैसर्गिक मार्ग आहे.
8/8
मासिक पाळीच्या वेळी दही किंवा लोणचे खाल्ल्याने रक्तप्रवाह थांबतो आणि स्त्रीने ते खाऊ नये असे सांगणारे कोणतेही पुरावे किंवा अभ्यास नाहीत.(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 23 Sep 2025 05:04 PM (IST)