तुमच्या फोनमधील ब्लूटूथ, लोकेशन, Wi-Fi नेहमी ऑन असतात? तर ही माहिती वाचा!

ब्लूटूथ सतत ऑन असल्यास अनोळखी डिव्हाइसेसशी अनवधानाने कनेक्ट होण्याचा धोका असतो, ज्यामुळे डेटा हॅकिंग होऊ शकतं.

स्मार्टफोन

1/9
आजकाल स्मार्टफोन हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलं आहे.
2/9
त्यामुळे ब्लूटूथ, लोकेशन आणि Wi-Fi सारखी फीचर्स आपण अनेकदा सतत ऑन ठेवतो.
3/9
पण हे कायम चालू ठेवणं कितपत सुरक्षित आहे, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.
4/9
ब्लूटूथ सतत ऑन असल्यास अनोळखी डिव्हाइसेसशी अनवधानाने कनेक्ट होण्याचा धोका असतो, ज्यामुळे डेटा हॅकिंग होऊ शकतं.
5/9
लोकेशन चालू ठेवल्यास अ‍ॅप्स तुमचा थरथरीत डेटा ट्रॅक करतात, त्यामुळे प्रायव्हसीचा प्रश्न निर्माण होतो.
6/9
Wi-Fi सतत ऑन ठेवल्यास, ओपन किंवा अनसेक्युर्ड नेटवर्कमधून फोनमध्ये मॅलवेअर येऊ शकतो.
7/9
म्हणूनच, या सेटिंग्ज गरज असेल तेव्हाच चालू ठेवाव्यात आणि वेळोवेळी फोनचे सिक्युरिटी अपडेट्स घेत राहावेत.
8/9
थोडक्यात, स्मार्टफोन वापर जितका स्मार्ट, तितकीच सुरक्षितताही आवश्यक!
9/9
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola