Job stress : नोकरीच्या चिंतेत आहात मग ही बातमी तुमच्यासाठी आहे...

Job stress : नोकरीच्या चिंतेत आहात मग ही बातमी तुमच्यासाठी आहे...

Job stress

1/10
बरेच लोक नोकरी गेल्याने टेंन्शन मध्ये येतात हतबल होतात. काय कराचे काय नाही त्यांना बऱ्याच वेळा समजत नाही. कारण, त्याच्यावर संपूर्ण घराची जबाबदारी असते. (Photo Credit :Unsplash)
2/10
कोणत्याही परिस्थितीत तुमची नोकरी गेली असेल तरी नोकरी गमावणे हा जीवनातील सर्वात तणावपूर्ण अनुभव असू शकतो. आपल्या जीवनात अनेक आर्थिक संकटे येताच राहतात, तसेच नोकरी गमावण्याचा ताण आपल्या मनस्थितीवर, नातेसंबंधांवर आणि एकूणच मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम करू शकतो.(Photo Credit :Unsplash)
3/10
आपली नोकरी हे आपल्यासाठी केवळ जगण्याचे साधन नसते तर त्याहूनही अधिक असते. ते म्हणजे आपल्याकडे बघण्याचा इतरांच्या दृष्टिकोनावर तसेच आपल्यावर असलेली कौटुंबिक जबाबदारी या सगळ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. (Photo Credit :Unsplash)
4/10
ते तुम्हाला एक सामाजिक आउटलेट देते आणि तुमच्या जीवनाला एक रचना, उद्देश आणि अर्थ देते.(Photo Credit :Unsplash)
5/10
तुम्हाला तुमची नोकरी आवडत नसली तरीही बऱ्याच वेळा अनेक जण ते काम करत असतात. कारण, त्यामुळे त्यांची आर्थिक कमतरता भरून निघत असते. त्यामुळे अनेक जण आवडत नसतांनाही ते काम करत असतात. (Photo Credit :Unsplash)
6/10
आपण सर्वांनाच माहितीये की, कोरोना काळात अनेकांना त्यांची नोकरी गमवावी लागली. त्या वेळी अनेक कुटुंबावर मोठे संकट आले होते. त्यावेळे ज्यांची नोकरी गेली त्यातील बऱ्याच जणांना अजूनही परत नोकरी मिळत नसल्याने अनेक लोक चिंतेत आहेत. (Photo Credit :Unsplash)
7/10
तुम्हला या तणावातून बाहेर यायचे असल्यास यावर अनेक उपाय आहेत ते ज्याचा वापर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात करू शकत. (Photo Credit :Unsplash)
8/10
तणावातून बाहेर येण्यासाठी लेखन तुम्हाला खूप मदत करू शकते. लेखन तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यास देखील मदत करेल. तुम्हाला काय हवे होते, काम करताना तुमचा अनुभव कसा होता आणि आता तुम्हाला काय हवे आहे, इत्यादी गोष्टी तुम्ही तुमच्या लिखाणात मांडू शकता. (Photo Credit :Unsplash)
9/10
अशा वेळी अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो आणि ते मोकळे पनाने बोलू शकत नाहीत किंवा कोणाला ते सांगण्याचा प्रयत्न करत नाहीत की, ते बेरोजगार आहेत. पण जोपर्यंत लोकांना तुमच्या अडचणी समजणार नाहीत तोपर्यंत तुमच्या समस्याही दूर होणे अशक्य आहे. त्यामुळे लोकांना कळू द्या की तुम्ही नोकरी शोधत आहात से केल्याने लोक तुम्हाला त्यांच्या नेटवर्कमध्ये येणाऱ्या रिक्त पदांबद्दल माहिती देऊ शकतील आणि तुमच्यासाठी ही सकारात्मक बातमी आणू शकेल(Photo Credit :Unsplash)
10/10
नोकरी गमावल्यानंतर आणि बेरोजगार झाल्यानंतर तणाव आणि चिंता असणे सामान्य आहे. पण, या काळात तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. एकटेपणा आणि निराशेने स्वतःला घेरू नका. एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या.(Photo Credit :Unsplash)
Sponsored Links by Taboola