तुम्हाला काय आवडतं समुद्री मासे की नदीचे मासे? जाणून घ्या फरक!

दोन्ही प्रकारचे मासे तुमच्या आहारात समावेश करायला उत्कृष्ट आहेत.

समुद्री मासे की नदीचे मासे?

1/10
समुद्री मासे आणि नदीचे मासे यांच्यात चव, टेक्स्चर, किंमत आणि पौष्टिक घटकांमध्ये स्पष्ट फरक असतो.
2/10
समुद्री माश्यांची चव थोडी खारटसर आणि स्ट्रॉंग असते कारण ते खाऱ्या पाण्यात वाढतात
3/10
तर नदीच्या मास्यांची चव माइल्ड आणि गोडसर असते.
4/10
टेक्स्चरच्या बाबतीत समुद्री मासे साधारणपणे घट्ट मांसाचे असतात
5/10
तसेच काही ऑयली तर काही सॉफ्ट असतात.
6/10
तर नदीचे मासे जास्त सॉफ्ट आणि नाजूक असतात, पण अनेकांमध्ये काटे जास्त असतात.
7/10
किंमतीत पाहिल्यास समुद्री मासे महाग असतात. उदा. सुरमई, पोम्फ्रेट यांची किंमत ₹700 ते ₹1200 किलोपर्यंत जाऊ शकते
8/10
तर नदीचे मासे तुलनेने स्वस्त, जसे की रोहु, कतला ₹250 ते ₹450 किलोमध्ये मिळतात.
9/10
पौष्टिकतेत समुद्री मासे ओमेगा-3 फॅटी अॅसिड, आयोडीन, व्हिटॅमिन D आणि B12 मध्ये समृद्ध असतात, तर नदीचे मासे पोटॅशियम, फॉस्फरस आणि B-कॉम्प्लेक्स विटॅमिन्समध्ये चांगले असतात.
10/10
त्यामुळे निवड चव, किंमत आणि आरोग्याच्या गरजांवर अवलंबून असते.
Sponsored Links by Taboola