2023 Sankashti Chaturthi : 2023 ची शेवटची संकष्टी चतुर्थी 30 डिसेंबर रोजी असेल; 'हे' उपाय केल्यास तुमचे प्रत्येक काम पूर्ण होईल
डिसेंबर २०२३ ही पौष महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी गणपतीची पूजा आणि काही विशेष उपाय केल्याने साधकाच्या प्रत्येक कार्यात त्याला यश मिळू शकते.(Photo Credit : Pexels)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2023 ची शेवटची संकष्टी चतुर्थी 30 डिसेंबर रोजी सकाळी 09.43 वाजता सुरू होईल आणि 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.55 वाजता संपेल. (Photo Credit : Pexels)
या दिवशी पूजेची वेळ सकाळी 08.30 ते 09.30 अशी आहे. शुभ मुहूर्तावर केलेली उपासना आणि नवीन कार्याची सुरुवात केल्याने यशस्वी फळ मिळू शकते.(Photo Credit : Pexels)
ज्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो त्यांनी पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला दुर्वा अर्पण कराव्यात. असे केल्यास तुम्हला तुमच्या कार्यात यश मिळण्यास मदत होईल. (Photo Credit : Pexels)
पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशासमोर चतुर्भुज दिवा लावावा आणि नंतर गणेश अर्थशीर्षाचे पठण करावे. असे मानले जाते की, या पद्धतीने पूजा केल्याने करिअरमधील अडथळे दूर होतात.(Photo Credit : Pexels)
अपत्यप्राप्तीसाठी गणेशाची उपासना उत्तम मानली जाते. नि:संतान जोडप्याने 2023 च्या शेवटच्या संकष्टी चतुर्थीला गणपतीला 21 ग्रॅम पिठाचे लाडू अर्पण करावे आणि नंतर ते असहाय्य किंवा गरीब मुलांना वाटावेत. संतती होण्यासाठी हे उपाय फायदेशीर आहेत.(Photo Credit : Pexels)
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 'ओम श्री ह्रीं क्लीम ग्लों गं गणपतये वर वरद सर्वजनम् मे वशमनाय स्वाहा. या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. (Photo Credit : Pexels)
या मंत्राचा जप केल्याने बाप्पा प्रसन्न होतात आणि धनवृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात. असे म्हटले जाते. (Photo Credit : Pexels)
तसेच या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा करण्यासोबतच चंद्राच्या दर्शनालाही विशेष महत्व असल्याचे सांगितले जाते. त्याच बरोबर असे म्हटले जाते की या दिवशी जो व्यक्ती मनापासून गणेशाची पूजा आणि आराधना करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. (Photo Credit : Pexels)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pexels)