वास्तुनुसार झाडांना पाणी घालण्याची योग्य वेळ; जाणून घ्या!
वास्तुशास्त्र सांगतं की झाडांची निगा राखणं म्हणजे केवळ त्यांना पाणी देणं नव्हे तर योग्य वेळ, दिशा आणि पद्धतीने ते करणं देखील महत्त्वाचं आहे.
वास्तुशास्त्र
1/9
वास्तुशास्त्रानुसार झाडांना पाणी घालण्याची वेळही महत्त्वाची मानली जाते.
2/9
योग्य वेळी पाणी दिल्यास झाडं चांगली वाढतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
3/9
सकाळी सूर्योदयानंतर ६ ते ८ वाजेच्या दरम्यान झाडांना पाणी घालणं उत्तम मानलं जातं. या वेळी वातावरण शुद्ध असतं आणि झाडं सूर्यप्रकाशातील ऊर्जा सहज शोषतात.
4/9
सायंकाळी सूर्यास्तानंतर झाडांना पाणी घालणं टाळावं, कारण या काळात झाडांची प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया थांबते आणि जास्त ओलावा राहिल्यास मुळे कुजू शकतात.
5/9
रात्री झाडांना पाणी घातल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते, असं वास्तुशास्त्र सांगतं.
6/9
म्हणूनच, सकाळी वेळेवर पाणी घालणं, झाडांची निगा राखणं आणि नियमित छाटणी करणं हे सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीसाठी फायदेशीर ठरतं.
7/9
दुपारच्या उष्णतेत झाडांना पाणी देणं टाळावं. या वेळी पाणी लवकर आटतं आणि मुळांपर्यंत ओलावा पोहोचत नाही.
8/9
काही झाडांना सायंकाळी थोडं पाणी देता येतं, परंतु सूर्यास्तानंतर लगेच पाणी घालणं टाळावं.
9/9
सूर्यास्तानंतर झाडांना पाणी घालणं वास्तुनुसार अशुभ मानलं जातं. कारण सूर्यप्रकाशाशिवाय झाडांची वाढ मंदावते, ओलसर मातीमुळे कीटक वाढतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते.
Published at : 20 Aug 2025 01:12 PM (IST)