Relationship Tips : बचके रहना रे बाबा..! तुमच्या नात्याबद्दलच्या 'या' गोष्टी गुप्त ठेवा, कोणालाही सांगू नका
कौटुंबिक कलहाबद्दल - जर तुमचे तुमच्या जोडीदाराशी भांडण झाले असेल किंवा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी किंवा तुमच्या कुटुंबियांशी जमत नसेल तर, हे कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला सांगू नका. हा तुमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, जो फक्त तुम्ही आणि तुमचा पार्टनर सोडवू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजोडीदारच्या कमतरतेबद्दल - तुमच्या पार्टनरमध्ये काही कमतरता असेल तर पार्टनरशी बोलून ती दूर करा. हे कधीही तिसऱ्या व्यक्तीला सांगू नका, तिसरी व्यक्ती तुमचे बोलणे ऐकून तुमची चेष्टा करू शकते.
आर्थिक परिस्थितीबद्दल - जर तुमची आर्थिक स्थिती थोडी खराब असेल तर ही बाब फक्त तुमच्यावर आणि तुमच्या जोडीदारावर सोडा. जर तुम्ही हे इतर कोणाला सांगितले तर तुमच्या जोडीदाराला याचे वाईट वाटू शकते.
जोडीदारच्या कमतरतेबद्दल - तुमच्या पार्टनरमध्ये काही कमतरता असेल तर पार्टनरशी बोलून ती दूर करा. हे कधीही तिसऱ्या व्यक्तीला सांगू नका, तिसरी व्यक्ती तुमचे बोलणे ऐकून तुमची चेष्टा करू शकते.
जोडीदाराचे रहस्य - तुमच्या जोडीदाराची गुपिते तुमच्या मित्रांनाही सांगू नका. काही गोष्टी तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या दरम्यान राहिल्या पाहिजेत, त्यामुळे विशेषत: हे लक्षात ठेवा की तुमच्या जोडीदाराचे रहस्य कोणालाही सांगू नका.
खरं तर, अनेकदा जेव्हा आपण आपल्या नात्याची गुपितं तिसऱ्या व्यक्तीला सांगतो, तेव्हा ती तिसरी व्यक्ती तुमची शुभचिंतक असेलच असं नाही. या कारणास्तव असे म्हटले जाते की तुम्ही तुमच्या नात्यातील काही गोष्टी इतर कोणालाही सांगू नका.