Cold Storage or Fridge : फ्रिज आणि कोल्ड स्टोरेज; फळं-भाज्यां ठेवण्याचा सोपा मार्ग!
फ्रिज घरगुती वापरासाठी योग्य असून फळं आणि भाज्या काही दिवस ताज्या ठेवते, तर कोल्ड स्टोरेज कमी तापमानामुळे वस्तू महिनाभर सुद्धा टिकवते आणि त्यांच्या गुणवत्ता जपते.
Continues below advertisement
Fridge or Cold Storage
Continues below advertisement
1/10
कोल्ड स्टोरेज आणि फ्रिज या दोन्हींचं काम वस्तुंना थंड ठेवण्याचं असतं. पण तुम्हाला माहित आहे का? या दोन्हींच्या तापमानात खूप मोठा फरक आहे.
2/10
तुमच्या फ्रिजचं तापमान साधारण 2 ते 4 डिग्रीपर्यंत असतं आणि कोल्ड स्टोरेजचं तापमान 0 ते 3 डिग्रीपर्यंत असतं.
3/10
उन्हाळ्यात अन्नपदार्थ, फळं आणि भाज्या लवकर खराब होतात आणि जास्त उष्णतेमुळे फळं आणि भाज्या सडू लागतात. त्यामुळे लोकं अन्न वाचवण्यासाठी ते फ्रिजमध्ये ठेवतात.
4/10
परंतु, फ्रिजमध्ये ठेवलं तरी वस्तू जास्त दिवस टिकत नाहीत. फळं आणि भाज्या जास्तीत जास्त एक आठवडा ताज्या राहतात.
5/10
कोल्ड स्टोरेजमध्ये तापमान खूप कमी ठेवले जाते. त्यामुळे फळं आणि भाज्या महिनाभर सुद्धा टिकून राहतात.
Continues below advertisement
6/10
कोल्ड स्टोरेजमध्ये तापमान वस्तूच्या प्रकारानुसार ठेवतात. काही लोकं कोल्ड स्टोरेजमध्ये तापमान 0 डिग्रीच्या खाली ठेवतात.
7/10
कमी तापमानामुळे वस्तूंची गुणवत्ता टिकून राहते आणि कोल्ड स्टोरेजमध्ये फळं-भाज्या ताज्या राहतात.
8/10
शेतकरी आपली पिकं कोल्ड स्टोरेजमध्ये साठवतात. त्यामुळे त्यांचे साठवलेलं सर्व धनधान्य आणि भाजीपाला सडण्यापासून वाचतं.
9/10
फ्रिज घरगुती वापरासाठी योग्य आहे. पण दीर्घकाळ साठवणीसाठी कोल्ड स्टोरेज अधिक चांगला आहे.
10/10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 15 Oct 2025 02:19 PM (IST)