Weight Gain Reasons : 'या' सवयींमुळे वाढतो लठ्ठपणा, कसे ते जाणून घ्या...

संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, जे लोक टीव्हीसमोर जास्त वेळ घालवतात त्यांचे वजन जास्त असते. याचे कारण असे की जेव्हा तुम्ही टीव्ही पाहता तेव्हा तुमच्या शरीराची हालचाल होत नाही, कोणत्याही कॅलरी जळत नाहीत. तुमचा स्क्रीन टाइम वाढतो आणि तुम्ही व्यायामासारख्या शारीरिक हालचालींसाठी वेळ कमी देता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तुम्ही खात असलेले पदार्थदेखील तुमच्या लठ्ठपणाचे कारण बनू शकते. मैद्यापासून तयार पदार्थ खाल्ल्यानेही लठ्ठपणासोबतच डायबिटीस आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका असतो. बाहेरील पिझ्झा, बर्गरसारखे पदार्थ तुमच्या शरीरातील चरबी वाढवते. सारखेचा वापर असलेले पदार्थ जसे की, फ्रूट ज्यूस, पेस्ट्री, केक, चॉकलेट इत्यादी पदार्थांमुळेही चरबी वाढते.

बहुतेक लोक हे ऑफिसच्या कामात व्यस्त असतात, घरी जेवण बनवण्यास त्यांना वेळ मिळत नाही आणि अशा वेळी ते जवळच्या फास्ट फूडचा पर्याय निवडतात आणि जंक फूड किंवा बाहेरचे जेवण जेवतात. जंक फूडमध्ये शून्य पौष्टिक मूल्य असते आणि ते तुमच्या आहारात अतिरिक्त कॅलरी जोडतात.
वजन वाढण्यामागे व्यायाम न करणे हे एक प्रमुख कारण आहे. ट्रॅफिकमध्ये फसण्यापासून, डेस्कवर तासनतास काम करण्यापासून ते दिवसाच्या शेवटी थकवा दूर करण्यासाठी टीव्हीसमोर बसण्यापर्यंत आपण शरीराला एकाच जागी आराम देतो. या सगळ्यात व्यायामासाठी वेळ देणं बाजूलाच राहतं आणि शरीरातील चरबी वाढते.
जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर तुमचे वजन वाढेल. झोप पूर्ण न होणे हे लठ्ठपणाचे मुख्य कारण आहे. आपल्याला किमान 7 ते 8 तासांची झोपे घेणे महत्वाचे आहे. झोप व्यवस्थित घेतली तर आपले वजन कमी होण्यास मदत होते.
दारू पिण्याच्या सवयीमुळे वजन वाढू शकते आणि लठ्ठपणा येऊ शकतो. अल्कोहोलचे दीर्घकाळ सेवन केल्यास यकृताच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात.
रात्रीच्या जेवणानंतर शरीराला थोडा वेळ द्यावा, रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नये. रात्रीचे जेवण करून लगेच झोपल्याने शरीराच चरबी जमा होते आणि लठ्ठपणा वाढतो.
कोका कोलासारखी गोड पेये खूप कॅलरीयुक्त असतात. शरीरात कॅलरीची संख्या वाढल्याने नको असलेल्या कॅलरी शरीर चरबीच्या रूपात साठवते.