Pomegranate Juice : वजन कमी करण्यासाठी डाळिंबाचा रस गुणकारी; वाचा फायदे
Pomegranate Juice : डाळिंबाच्या रसामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते.
pomegranate juice
1/8
डाळिंबाचा रस एक पौष्टिक आणि चवदार रस आहे, ज्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात.
2/8
डाळिंबाच्या ज्यूसमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. ते प्यायल्यानंतर, तुम्हाला लवकर भूक लागत नाही.
3/8
डाळिंबाच्या रसामध्ये भरपूर साखर आणि जीवनसत्त्वे असतात. रसामध्ये असलेली साखर जीवनसत्त्वे आणि खनिजांसह सहज पचते.
4/8
डाळिंबाचा रस प्यायल्यानंतर काहीही खाण्याची इच्छा नाहीशी होते. म्हणूनच हा रस वजन कमी करण्यासाठी प्रभावी मानला जातो.
5/8
ताज्या डाळिंबाच्या रसामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचन आणि कॅलरीज बर्न करण्यास मदत करते.
6/8
डाळिंबात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवतात आणि चयापचय दर वाढवतात.
7/8
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर डाळिंबाच्या रसाचे सेवन करा. कारण यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते. त्यात कमी कॅलरीज, जास्त फायबर आणि पॉलिफेनॉल असतात.
8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 26 Mar 2023 11:36 PM (IST)