pomegranate Benefits : डाळिंब खाल्ल्याने या 5 समस्यांपासून मिळेल सुटका; आजच आहारात समावेश करा
डाळिंब हे असं फळ आहे ज्याच्या लाल रसाने भरलेले गोड दाणे सर्वांना खायला फार आवडतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनाच डाळिंब खायला आवडतं. डाळिंब केवळ चवीनेच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
डाळिंबात फायबर, व्हिटॅमिन के, सी आणि बी, लोह, पोटॅशियम, जस्त आणि ओमेगा -6 फॅटी अॅसिड आणि इतर अनेक पोषक घटक असतात.
डाळिंबाचा रस प्यायल्याने आपल्या त्वचेच्या बाहेरील थराचे संरक्षण होते. हे केवळ रक्ताभिसरण सुधारत नाही तर ऊतींना सुरक्षित ठेवण्यास देखील मदत करते.
डाळिंबाचा रस प्यायल्याने हायपरपिग्मेंटेशनच्या समस्येपासूनही आराम मिळतो. हा रस वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी देखील काम करतो.
डाळिंबात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे तुमची त्वचा अधिक तजेलदार होते.
वजन कमी करण्यातही डाळिंबाचा रस खूप फायदेशीर आहे. डाळिंबात भरपूर पोषक असतात, त्यात कॅलरीज कमी असतात, त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
जर तुम्ही दररोज 150 मिली डाळिंबाच्या रसाचे सेवन केले तर उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होईल. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स रक्तात चरबी जमा होऊ देत नाहीत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.