Skin Care: प्रदूषणामुळे तुमच्या त्वचेचे गंभीर नुकसान होत आहे, या सोप्या टिप्स वापरून तुमच्या त्वचेची काळजी घ्या!
देशातील अनेक भागात वाढत्या प्रदूषणामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचांगल्या त्वचेसाठी एअर प्युरिफायरमध्ये गुंतवणूक करा. बहुतेक ऍलर्जी धुळीमुळे होतात. घरातील वातावरण स्वच्छ करण्यात आणि धूळ आणि इतर हानिकारक कण काढून टाकण्यासाठी चांगल्या दर्जाचे एअर प्युरिफायर उपयोगी आहे.
कोणत्याही कामानंतर आणि आपल्या त्वचेला स्पर्श करण्यापूर्वी आपले हात नेहमी चांगले धुवा.
दिवसातून किमान दोनदा तुमचे कपडे बदला आणि तुमच्या त्वचेतील सर्व प्रदूषक काढून टाकण्यासाठी तुम्ही नियमितपणे आंघोळ करा.
संवेदनशील त्वचेची लवचिकता सुधारण्यासाठी उत्तम प्रतीचे मॉइस्चराइजर वापरा.
बाहेर पडताना, नेहमी Cetaphil Moisturizing Cream सारखे मॉइश्चरायझर सोबत ठेवा, जे त्वचेला तीव्र ओलावा देऊ शकते.
हवा ताजी असताना मॉर्निंग वॉकसाठी जा.
तसेच सनस्क्रीन लावायला विसरू नका, कारण सूर्याची किरणं घातक हवेच्या गुणवत्तेसह तुमच्या त्वचेला आणखी त्रास देऊ शकतात. (all photos credit: /unsplash.com)टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.