vande amrit express : आतून अशी दिसते वंदे साधारण एक्सप्रेस! वाचा सारं काही!
वंदे भारत एक्स्प्रेसनंतर (Vande Bharat Expres) आता प्रवाशांसाठी 'वंदे साधारण एक्स्प्रेस' (Vande Sadharan Express) प्रवासांच्या सेवेत दाखल होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवंदे भारतच्या धरतीवर बनवण्यात आलेली ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेली सुपरफास्ट नॉन एसी एक्सप्रेस आहे.
LHB push pull ट्रेन म्हणजेच वंदे साधारण एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. वंदे साधारण ही एक्सप्रेस नुकतीच चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून तयार होऊन मुंबईत दाखल झाली आहे.
वंदे भारतच्या धर्तीवर बनवण्यात आलेली ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेली सुपरफास्ट नॉन एसी एक्सप्रेस आहे.
फेब्रुवारी 2019 मध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यापासून उच्च आणि मध्यमवर्गीय प्रवाशांच्या पसंतीस उतरली मात्र गरीब आणि सर्वसाधारण प्रवाशांसाठी देखील त्याच दर्जाच्या सोयी आणि सुविधांसह कमी किमतीत प्रवास करण्यासाठी वंदे साधारण एक्सप्रेस बनवण्यात आली आहे.
या एक्सप्रेसमध्ये पुश पुल टेक्नॉलॉजी असलेले दोन इंजिन पुढे आणि मागे लावण्यात आलेले आहेत.
एक्सप्रेसमध्ये 12 स्लीपर नॉन एसी कोच, आठ जनरल कोच, आणि दोन कोच असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मजूर आणि कामगार वर्गासाठी हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ताशी 130 च्या वेगाने ही गाडी धावेल.
या गाडीमध्ये पण ते वंदे भारत प्रमाणेच अनेक नवीन आणि अध्यायावत सोवी सुविधा देण्यात आलेल्या आहेत.
या गाडीला खास असा भगवा आणि करडा रंग देण्यात आलेला आहे. तसेच मुंबईमधून ही गाडी मुंबई ते दिल्ली आणि मुंबई ते पटना त्या दोन मार्गांवर चालवण्याची शक्यता आहे.